|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.59° C

कमाल तापमान : 31.19° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 80 %

वायू वेग : 5.39 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.19° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 31.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.21°C - 30.3°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 29.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.53°C - 29.71°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.57°C - 29.92°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.61°C - 30.12°C

light rain

आपली विचारसरणी देशहिताच्या विरोधात जाऊ नये

आपली विचारसरणी देशहिताच्या विरोधात जाऊ नयेनरेंद्र मोदींचा ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांना सल्ला, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – सामान्य आणि मोठ्या कारणांच्या विरोधात लढा देताना कधीही स्वतःची विचारसरणी सोडू नये. जेव्हा लोक महात्मा गांधी यांच्यासोबत जुळले, त्यावेळी त्यांनी स्वतःची विचारसरणी सोडली नव्हती. मी आणिबाणीचे दिवस पाहिले आहेत. विविध राजकीय विचारसरणी असलेल्या लोकांना त्यावेळी पाहिले. मात्र, ते सर्वच देशहितासाठी एकत्र आले होते, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिला. विद्यापीठातील स्वामी विवेकानंद यांच्या...13 Nov 2020 / No Comment /

२.६५ लाख कोटींचे तिसरे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर

२.६५ लाख कोटींचे तिसरे आत्मनिर्भर पॅकेज जाहीररोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणारी योजना, तणावातील क्षेत्रांना कर्ज, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – कोरोना महामारीचा फटका बसलेल्या आणि त्यामुळे तांत्रिक मंदीच्या फेर्‍यात येण्याची शक्यता असलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि भांडवली खर्च वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २,६५,०८० कोटी रुपयांच्या तिसर्‍या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली. या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार आहे तसेच तणावात असलेल्या २६ क्षेत्रांना देखील बळ मिळणार आहे. घर खरेदी करणार्‍यांना आणि स्थावर मालमत्ता विकसकांचा देखील यात समावेश...12 Nov 2020 / No Comment /

प्राचीन उपचार पद्धती कोट्यवधींचा जीवनाधार

प्राचीन उपचार पद्धती कोट्यवधींचा जीवनाधारनागपूर, १२ नोव्हेंबर – दिवाळीतील धनत्रयोदशी दिवस दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला. त्यानुसार २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पहिला आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यंदा शुक्रवार, १३ नोव्हेंबर धनत्रयोदशीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात येणार आहे. आयुर्वेद केवळ औषधोपचार पद्धती नसून स्वस्थ आणि दीर्घायुष्यासाठीचे शास्त्र आहे. आज या प्राचीन भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच...12 Nov 2020 / No Comment /

कबरताल ठरली बिहारची पहिली पाणथळ भूमी

कबरताल ठरली बिहारची पहिली पाणथळ भूमीआंतरराष्ट्रीय क्षेत्र म्हणून मान्यता, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील कबरतालला राज्यातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. रामसर परिषदेअंतर्गत ही मान्यता देण्यात आल्याचे केंेद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. बिहारला पहिली...12 Nov 2020 / No Comment /

बिहारी जनता पारखी, जागरूक : पंतप्रधान मोदी

बिहारी जनता पारखी, जागरूक : पंतप्रधान मोदीपंतप्रधान मोदी यांनी मानले मतदारांचे आभार, मौन मतदार भाजपाची ताकद, नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – बिहारची जनता केवळ हुशारच नाही, तर पारख करणारीही आहे. आपल्या हितात काय आहे, कोण आपला विकास करू शकतो, याची पारख ते करू शकतात. त्यांची दिशाभूल कुणीच करू शकत नाही. यातही मतदारांचा एक वर्ग असा आहे, जो नेहमीच मौन राहतो, त्याला ‘सायलेंट व्होटर’ म्हणतात. तो म्हणजे, या देशातील माता व भगिनी आहेत. ही नारी शक्ती नेहमीच भाजपाच्या...11 Nov 2020 / No Comment /

नृत्यगोपाल दास यांची प्रकृती चिंताजनक

नृत्यगोपाल दास यांची प्रकृती चिंताजनकलखनौ, ११ नोव्हेंबर – राममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती, त्यांच्यावर उपचार करणार्‍या मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांनी आज बुधवारी दिली. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आज मेदांताला भेट देऊन दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सुमारे १५ मिनिटे ते रुग्णालयात होते. मंगळवारी दास यांच्या डायलेसिसची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी यातून ते नक्कीच बाहेर येतील. परिस्थिती अजूनही आमच्या हाताबाहेर गेलेली नाही,...11 Nov 2020 / No Comment /

असंघटित क्षेत्रातील २५ कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षाकवच

असंघटित क्षेत्रातील २५ कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षाकवचनवी दिल्ली, ११ ऑक्टोबर – वृद्धापकाळातील सेवानिवृत्ती, आरोग्य विमा, अपंगत्व मदत आणि इतर सामाजिक सुरक्षेचे फायदे सर्वच विभागातील असंघटित कामगारांना मिळावे, यासाठी केंद्र सरकार या क्षेत्रातील २५ कोटी कामगारांना पुढील पाच वर्षांत सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करणार आहे. अलिकडेच पारित करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा विधेयकानुसार सायकल रिक्षाचालक आणि स्थलांतरित कामगारांनाही लाभ दिला जाणार आहे. देशात सध्या सुमारे ५० कोटी असंघटित कामगार असून, त्यापैकी ५ कोटी कामगारांनाच सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले...11 Nov 2020 / No Comment /

५९ पैकी ३७ जागांवर भाजपाचा विजय

५९ पैकी ३७ जागांवर भाजपाचा विजय११ राज्यांतील पोटनिवडणुका, मध्यप्रदेशात १६ जिंकल्या, ५ वर आघाडी, नवी दिल्ली, १० नोव्हेंबर – देशभरातील ११ राज्यांत ५९ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने ३७ जागांवर झेंडा फडकवला आहे. गुजरातमध्ये ८ पैकी ८ जागा, तर उत्तरप्रदेशात एकूण ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवून कॉंग्रेसच्या पुनरागमनाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. कर्नाटकातील २ आणि तेलंगणातील एका जागेसाठी झालेली निवडणूकही भाजपाने जिंकली. मणिपूरमधील एकूण ५ जागांपैकी ४ जागा भाजपाने काबीज करीत ईशान्येतही दमदार कामगिरी केली. मध्यप्रदेशातील...11 Nov 2020 / No Comment /

नक्षलवाद संपविण्यासाठी ‘प्रहार-३’

नक्षलवाद संपविण्यासाठी ‘प्रहार-३’अमित शाह यांनी तयार केली योजना, नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – महाराष्ट्रासह काही राज्यांमधील नक्षलवादाची समस्या कायमची संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘प्रहार-३’ ही धाडसी योजना तयार केली आहे. निमलष्करी दलांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत त्यांनी या योजनेंतर्गत नक्षल्यांचा बिमोड कसा करायचा, याबाबत काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. सध्या ज्या प्रकारे नक्षलविरोधी मोहिता हाती घेतल्या जात आहेत, त्यावर ते प्रचंड नाराज आहेत. नक्षली कारवायांचा संपूर्ण बिमोड न करणार्‍या आणि त्यांच्याशी...8 Nov 2020 / No Comment /

गरिबांचे आयुष्य सुलभ करा

गरिबांचे आयुष्य सुलभ करापंतप्रधान मोदी यांचे आवाहन, नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – आम्ही तुम्हाला व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझिनेस) देतो, त्या मोबदल्यात तुम्ही गरिबातल्या गरीब व्यक्तीचे आयुष्य सुलभ होईल, असे कार्य करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांना केले. कोरोनाच्या काळात जग बदलले आहे, कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर जगात आणखी मोठे बदल झालेले असतील, असेही मोदी यांनी सांगितले. आयआयटी दिल्लीच्या ५१ व्या दीक्षांत समारंभाला आभासी माध्यमातून संबोधित...7 Nov 2020 / No Comment /

हवामान खाते देणार मलेरियाच्या उद्रेकाचा अंदाज

हवामान खाते देणार मलेरियाच्या उद्रेकाचा अंदाजनवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – पुढच्या मान्सूनपासून भारतीय हवामान विभाग मलेरियाच्या उद्रेकाचा अंदाजही सादर करणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन् यांनी आज शनिवारी दिली. उच्च कार्यप्रदर्शन संगणनाची (एचपीसी) क्षमता वाढवण्याची योजना भारताने आखली आहे. सध्या याची क्षमता १० पेटाफ्लॉप्स असून, ती ४० पेटाफ्लॉप्स केली जाईल. यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात सुधारणा होईल, असे त्यांनी भारतीय विज्ञान अकादमीने ‘हवामान आणि हवामान अंदाजातील अलिकडील प्रगती’ या विषयावर आयोजित केलेल्या...7 Nov 2020 / No Comment /

सरकारने नाकारल्या ४.३९ कोटी बोगस शिधापत्रिका

सरकारने नाकारल्या ४.३९ कोटी बोगस शिधापत्रिकानवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनाच शिधापत्रिका (रेशन कार्ड) मिळाव्या असे सरकारचे धोरण आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी २०१३ पासून सुमारे ४.३९ बोगस शिधापत्रिका नाकारल्या असल्याचे शुक्रवारी सरकारने म्हटले आहे. हटवलेल्या शिधापत्रिकांच्या जागी अस्सल आणि पात्र लाभार्थ्यांना किंवा कुटुंबांना नवीन शिधापत्रिका दिल्या जात आहेत, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने...7 Nov 2020 / No Comment /