किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.79°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलआंतरराष्ट्रीय क्षेत्र म्हणून मान्यता,
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील कबरतालला राज्यातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. रामसर परिषदेअंतर्गत ही मान्यता देण्यात आल्याचे केंेद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.
बिहारला पहिली रामसर साईट मिळाल्याची माहिती देताना आनंद होत आहे. बेगुसरायमधील कबरतालला आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळीची भूमी म्हणून मान्यता मिळाली आहे, असे टि्वट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. त्यांनी स्थलांतरित पक्षी आणि जैवविविधतेसाठी मध्य आशियातील ही महत्त्वाची पाणथळ जमीन आहे, असेही त्यांनी नमूद केले. आता भारताकडे एकूण ३९ रामसर साईट्स आहेत.
यात ओडिशामधील चिल्का सरोवर, राजस्थानमधील केवलदेव राष्ट्रीय उद्यान, पंजाबमधील हरीके तलाव, मणिपूरमधील लोकटक तलाव आणि जम्मू-काश्मीरमधील वूलर सरोवर यांचा समावेश आहे.
पाणथळ जागा अतिशय वैविध्यपूर्ण आणि उत्पादक परिसंस्था असतात. त्यांच्यामुळे आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. पण, पाणथळ जागांचा दर्जा सातत्याने घसरत आहे आणि त्यांचा वापर इतर कारणांसाठी केला जात आहे. या ठरावामध्ये पाणथळ जागांची विस्तृत व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाणथळ जागांमध्ये सर्व तलाव, नद्या, दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, खारफुटी वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे इत्यादींचा तसेच मत्स्य संवर्धनासाठीची तळी, भात शेती, पाणी साठे आणि मिठागरे या मानवनिर्मित ठिकाणांचा सुद्धा समावेश होतो.