किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनागपूर, १२ नोव्हेंबर – दिवाळीतील धनत्रयोदशी दिवस दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला. त्यानुसार २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पहिला आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यंदा शुक्रवार, १३ नोव्हेंबर धनत्रयोदशीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात येणार आहे. आयुर्वेद केवळ औषधोपचार पद्धती नसून स्वस्थ आणि दीर्घायुष्यासाठीचे शास्त्र आहे.
आज या प्राचीन भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच केंद्र सरकारतर्फे स्वतंत्र आयुष मंत्रालय बनविण्यात आले आहे. आयुषचे आयुर्वेदासंबंधीचे राष्ट्रीय तसेच महाराष्ट्रातील २०२० साठीचे ‘व्हिजन’ पूर्ण करण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. आयुर्वेदिक वनौषधींच्या संशोधन प्रकल्पापासून राज्याराज्यात आयुषचे व्यवस्थापन मजबूत करण्याची देखील केंद्राची योजना आहे. तसेच आयुर्वेदांतर्गत औषधी गुणधर्म असलेल्या एकूण १० हजार वनस्पतींची नोंद असून या वनस्पतींच्या औषधी गुणधर्मावर संशोधन करणे, एकात्मिक आयुष सेवेचे जाळे देशपातळीवर तयार करणे, आयुर्वेद अध्यापकांचा शैक्षणिक दर्जा वाढवणे, परवडणारी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देणे हे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
१९७६ साली भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची (एनआयए) स्थापना १९७६ मध्ये जयपूर येथे करण्यात आली. ही आयुर्वेदातील प्रशिक्षण आणि संशोधनाची भारतातील सर्वोच्च संस्था आहे.
महाराष्ट्रात आयुर्वेदाचे शिक्षण देणारी चार सरकारी, १६ अनुदानित आणि ६० खाजगी महाविद्यालये आहेत. २०१५ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ६० हजारांहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
अलिकडील काळात रामदेवबाबा आणि नैसर्गिक उपचार करणार्या अन्य व्यक्तींनी देशभरात आयुर्वेदाबद्दल सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे आयुर्वेद, नैसर्गिक उपचार पद्धती आणि हर्बल मेडिसिनमुळे निरामय आरोग्यसेवा हा विश्वास देशातील कोट्यवधी लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आयुर्वेदिक औषधांच्या वाढत्या मागणीमुळे आणि कमी कालावधीत अधिक नफा मिळत असल्याने आज देशभरातील विविध राज्यांमध्ये औषधी झाडांची शेती करण्याकडे अनेकांचा कल वाढला असल्याचे चित्र आहे.