किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.79°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – आसियान देशांत सामाजिक, डिजिटल आणि आर्थिक क्षेत्राचा समावेश असलेली जोडणी वाढवण्यास भारताचे सर्वाधिक प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी भारत आणि आसियान देशांच्या परिषदेत सांगितले.
प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धीसाठी एक सुसंगत प्रतिसाद देण्यासाठी आसियान आवश्यक असल्याचा आम्हाला विश्वास आहे. भारताच्या भारत-प्रशांत पुढाकार आणि आसियानचा भारत-प्रशांतकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कितीतरी साम्य आहे. भौतिक, आर्थिक, सामाजिक, डिजिटल, वित्तीय, सामुद्री जोडणी वाढवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मागील काही वर्षांत आम्ही या क्षेत्रांत जवळ आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
‘द असोसिएशन ऑफ साऊथईस्ट आशियन नेशन्स’ अर्थात् आसियान ही या क्षेत्रातील सर्वांत प्रभावी संघटना आहे. अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया याचे चर्चात्मक भागीदार आहेत.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि दक्षिण चिनी समुद्रात चीनचा आक्रमकपणा वाढत असून, त्या पृष्ठभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडियाचा या १० देशांचा समावेश आसियानमध्ये आहे.