किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 22.52° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 25.37°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.3°से. - 27.19°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.18°से. - 26.01°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.95°से. - 25.33°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश23.73°से. - 25.86°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.32°से. - 26.84°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला लवकर मिळावी, हे सुनिश्चित करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे, असे रशियाने आज गुरुवारी सांगितले. या क्षेपणास्त्र यंत्रणेची पहिली खेप पुढील वर्षी देशात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय लष्करासाठी २०० कामोव्ह केए-२२६टी हेलिकॉप्टर्सच्या उत्पादनासाठी भारत आणि रशिया संयुक्त उपक्रम स्थापन करणार असून, या अब्जावधी डॉलर्सच्या एका करारावर सध्या काम केले जात आहे तसेच दोन्ही लष्करी वाहतूक सहकार्य करारावरही काम करीत आहेत, अशी माहिती रशियाचे भारतातील उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी आभासी पत्रकार परिषदेत दिली.
भारत आणि रशियातील संरक्षण सहकार्य मजबूत आहेत. यावर कोणत्याही देशाचा परिणाम होणार नाही, असे त्यांनी भारत व अमेरिकेत झालेल्या ‘बिका’ करारावर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भारताचे अमेरिकेसह इतर देशांसोबत निर्माण होत असलेल्या धोरणात्मक संबंधांवर आमची नजर आहे. पण, त्याचवेळी भारताचे कोणत्याही देशासोबत धोरणात्मक संबंध दृढ होत असतील, त्याचा रशियाच्या हितांवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत-रशियातील संरक्षण सहकार्याबाबत म्हणाल, तर ते अतिशय मजबूत आहेत. या संंबंधातून दोन्ही देशांचे हित प्रतिबिंबित होते आणि आमच्या संबंधाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आम्ही आश्वस्त आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याची मुदत बदललेली नाही. या यंत्रणेची पहिली खेप २०२१ च्या अखेरीस भारताला प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.