|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:11 पी एम
हवामान

किमान तापमान : 21.99° से.

कमाल तापमान : 22.52° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 3.48 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

21.99° से.

हवामानाचा अंदाज

21.99°से. - 25.37°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.3°से. - 27.19°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.18°से. - 26.01°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.95°से. - 25.33°से.

गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.73°से. - 25.86°से.

शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.32°से. - 26.84°से.

शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » बिहारी जनता पारखी, जागरूक : पंतप्रधान मोदी

बिहारी जनता पारखी, जागरूक : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी मानले मतदारांचे आभार, मौन मतदार भाजपाची ताकद,
नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – बिहारची जनता केवळ हुशारच नाही, तर पारख करणारीही आहे. आपल्या हितात काय आहे, कोण आपला विकास करू शकतो, याची पारख ते करू शकतात. त्यांची दिशाभूल कुणीच करू शकत नाही. यातही मतदारांचा एक वर्ग असा आहे, जो नेहमीच मौन राहतो, त्याला ‘सायलेंट व्होटर’ म्हणतात. तो म्हणजे, या देशातील माता व भगिनी आहेत. ही नारी शक्ती नेहमीच भाजपाच्या पाठीशी असते. काहीच न बोलता ते आपला आशीर्वाद भाजपाला देत असतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी बिहारसोबतच, पोटनिवडणुका झालेल्या अन्य राज्यांमधील मतदारांचे आभार मानले.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित रालोआला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि भाजपाला मिळालेल्या सर्वाधिक जागांबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपा मुख्यालयात धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथसिंह, नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते.
आज मी देशातील कोटीकोटी जनतेला धन्यवाद देतो, निवडणुकीतील रालोआच्या विजयाकरिता नाही, तर लोकशाहीचा हा उत्सव उत्साहपूर्ण साजरा केल्याबद्दल. लोकशाही कशी असते, याचे उदाहरण आज आपण जगापुढे ठेवले आहे. नितीशकुमारांच्या नेतृत्वातील सरकार बिहारी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करेल. बिहारचा विकास करण्यात प्रयत्न कमी पडणार नाही, असे ते म्हणाले.
पूर्वी निवडणूककाळात इतके बुथ लुटले, इतक्या केंद्रांवर फेरमतदान होणार आहे, अशा बातम्या येत होत्या. आता इतकी टक्केवारी वाढली, मतदान शांततेत पार पडले, अशा बातम्या ऐकायला मिळतात. कोरोनामुळे मतदान कमी होईल, या शंकाही फोल ठरल्या. हीच आपल्या देशाची ताकद आहे.
कोरोनात निवडणूक सोप्या नव्हता, पण आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था इतकी मजबूत आहे की, निवडणुका यशस्वीपणे पार पाडून जगाला आश्‍चर्यचकित केले, असे मोदी यांनी सांगितले.
ममता बॅनर्जीवरही प्रहार
कार्यकर्त्यांची हत्या करण्याच्या खेळाने प्रत्येकवेळी विजय मिळू शकत नाही. हा खेळ एक दिवस तुमच्यावरच उलटणार आहे. दडपशाहीने मतदार घाबरतात, हा समज आता मनातून काढून टाका, अशा शब्दांत त्यांनी तृणमूल कॉंगे्रसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली.
युवकांनी भाजपात यावे
देशातील युवकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी पुढे यावे आणि भाजपाच्या माध्यमातून देशसेवेत जुळावे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, आपल्या संकल्पांना सिद्ध करण्यासाठी कमळाला हातात घेऊन मार्गक्रमण करावे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 11 Nov 2020
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g