किमान तापमान : 26.67° से.
कमाल तापमान : 28.03° से.
तापमान विवरण : light rain
आद्रता : 82 %
वायू वेग : 1.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.67° से.
26.99°से. - 29.84°से.
गुरुवार, 17 ऑक्टोबर मध्यम वर्षा26.77°से. - 28.92°से.
शुक्रवार, 18 ऑक्टोबर मध्यम वर्षा26.96°से. - 28.88°से.
शनिवार, 19 ऑक्टोबर हल्की वर्षा27.47°से. - 29.29°से.
रविवार, 20 ऑक्टोबर मध्यम वर्षा27.5°से. - 28.62°से.
सोमवार, 21 ऑक्टोबर हल्की वर्षा27.18°से. - 29.23°से.
मंगळवार, 22 ऑक्टोबर हल्की वर्षा– शेख हसीना यांच्या जवळचे मेजर जनरल हे सेवेतून बडतर्फ,
ढाका, (०६ ऑगस्ट) – बांगलादेशात लष्करी पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे निकटवर्तीय मेजर जनरल झियाउल अहसान यांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. हा फेरबदल बांगलादेश लष्कराच्या सर्वोच्च पदांमध्ये करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बांगलादेशातील मीडियाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील एका वरिष्ठ लष्करी अधिकार्याला बडतर्फ करण्यात आले आहे. येथे ७ वरिष्ठ लष्करी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून मेजर जनरल झियाउल अहसान यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
लेफ्टनंट जनरल मोहम्मद सैफुल आलम यांची परराष्ट्र मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल मोहम्मद मुजीबुर रहमान यांची जनरल ऑफिसर कमांडिंग, आर्मी ट्रेनिंग आणि डॉक्ट्रीन कमांड म्हणून बदली करण्यात आली. लेफ्टनंट जनरल अहमद तबरेझ शम्स चौधरी यांची क्वार्टर मास्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लेफ्टनंट जनरल मिझानुर रहमान शमीम चीफ ऑफ द जनरल स्टाफ बनले आहेत. लेफ्टनंट जनरल मोहम्मद शाहीनुल हक यांची छॄउ चे कमांडंट म्हणून आणि मेजर जनरल अडछ रिजवानूर रहमान यांची छढचउ चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त केली
राष्ट्रपती मोहम्मद शाहबुद्दीन यांनी संसद बरखास्त केल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. यासोबतच देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचीही सुटका करण्यात आली आहे. मंगळवारी बांगलादेशातील आंदोलक विद्यार्थ्यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत संसद बरखास्त करण्याचा अल्टिमेटम दिला होता.
याशिवाय १ जुलै ते ऑगस्ट दरम्यान अटक केलेल्यांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याआधीच अनेकांची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी संसद बरखास्त करण्याच्या निर्णयामुळे देशात नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेख हसीना यांनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात देशभरात हिंसाचाराच्या घटनांमध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक बातम्यांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.