किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलढाका, (०६ ऑगस्ट) – बांग्लादेशातील तणावपूर्ण परिस्थिती आणि निदर्शक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की आता ढाकामध्ये आंदोलकांकडून हिंदूंना लक्ष्य केले जाऊ लागले आहे. इतकेच नाही तर हिंदूंची दुकाने लुटली गेली आणि अनेकांची घरेही जाळली गेली. दरम्यान, बांगलादेशच्या मेहेरपूर इस्कॉन मंदिराची छायाचित्रे समोर आली आहेत. दंगलखोरांनी या मंदिराची तोडफोड करून आग लावली.
एका वृत्तानुसार, २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. मौल्यवान वस्तू लुटल्या आहेत. मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. वृत्तानुसार, लालमोनिरहाट सदर उपजिल्हामध्ये धार्मिक हिंदू कार्यक्रमांशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली आहे. सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, परिस्थिती कशीही असली तरी त्याची माहिती दिली जाईल. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये सुमारे १२ ते १३,००० भारतीय आहेत. परिस्थिती इतकी चिंताजनक नाही की त्यांना एअरलिफ्ट करण्याची गरज आहे. शेख हसीना भारतात राहणार की अन्य कोणत्या देशात राजकीय आश्रय घेणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.