|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.97° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 3.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.79°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.79°C - 30.02°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.76°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28°C - 29.92°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.82°C

broken clouds
Home » कला भारती » ’गदर २’ नंतर सनी देओल आता ’बॉर्डर २’ मध्ये

’गदर २’ नंतर सनी देओल आता ’बॉर्डर २’ मध्ये

मुंबई, (१९ ऑगस्ट) – सनी देओलचा ’गदर २’ चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. २००१ मध्ये रिलीज झालेल्या ’गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या २२ वर्षांनंतर सनी देओलने पुन्हा एकदा ’तारा सिंह’ बनून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला. त्याच्या ’गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट ५०० कोटी क्लबमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाच्या या यशाने सनी देओलच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा ’चार-चांद’ लावला आहे. अशा परिस्थितीत सनी देओलबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
’गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, जो लोकांना खूप आवडला आहे. दरम्यान, सनी देओल लवकरच त्याचा पुढचा सिक्वेल ’बॉर्डर २’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याची बातमी आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सनी देओलचे चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत.
माहितीनुसार, ’गदर २’ चित्रपटानंतर सनी देओलने आता ’बॉर्डर २’ची तयारी सुरू केली आहे. चित्रपटाच्या या दुसर्‍या भागाची कथा १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असेल. जेपी दत्ता आणि निधी दत्ता ’बॉर्डर २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, चित्रपटासाठी आघाडीच्या स्टुडिओशी सहकार्यासाठी बोलणी सुरू आहेत.
’बॉर्डर २’ चित्रपटाची पार्श्वभूमीही भारतीय लष्करावर असणार आहे. माहितीनुसार, लवकरच चित्रपटाच्या कथेवर काम सुरू करण्यात येणार आहे. ’बॉर्डर २’ पूर्णपणे अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट असेल. यामध्ये जुन्या कलाकारांच्या जागी नव्या कलाकारांना स्थान देण्यात येणार आहे. चित्रपटात आजच्या काळातील अनेक कलाकार दिसणार आहेत. ’बॉर्डर’ चित्रपटातील फक्त सनी देओल त्याच्या दुसर्‍या भागाचा एक भाग असणार असल्याची माहिती आहे.

Posted by : | on : 21 Aug 2023
Filed under : कला भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g