किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, ऍव्हरेज २२.५ किमी=
कोची, [८ फेब्रुवारी] – पेट्रोल आणि डिझेल सध्या स्वस्त होत असले, तरी हे इंधन किती काळ टिकेल याची शाश्वती नसल्याने भविष्याची गरज लक्षात घेऊन भारतीय शास्त्रज्ञांनी चक्क खोबरेल तेलावर मिनी ट्रक चालविण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. विशेष म्हणजे, एक लिटर खोबरेल तेलावर या मिनी ट्रकने २२.५ किमी अंतर सहजपणे कापले. तिथेच, एक लिटर डिझेलमध्ये ट्रक केवळ १६ किमी अंतर पार करू शकला.
केरळच्या वैज्ञानिकांनी हा अफलातून शोध लावला आहे. गेल्या एक वर्षापासून ते खोबरेल तेलावर टाटाचा मिनी ट्रक चालवत आहेत. आपल्या या प्रयोगाचे केंद्र सरकारपुढे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी संपर्क साधला आहे.
हा अभिनव शोध लावणारे सर्व शास्त्रज्ञ एससीएमएस इन्स्टिट्युट ऑफ बायोसायन्स ऍण्ड बायोटेक्लॉलॉजी रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट तसेच एससीएमएस स्कूल ऑफ इंजीनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत. आम्ही एक वर्षापूर्वीच हा मिनी ट्रक खरेदी केला. गेल्या एक वर्षाच्या काळात हा ट्रक खोबरेल तेलावर २० हजार किमी इतके अंतर चालला आहे. त्यामुळे डिझेलची जागा खोबरेल तेल घेऊ शकते, यात आता कुठलीही शंका राहिली नाही, असे सहा शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्व करणारे सी. मोहनकुमार यांनी सांगितले.
याचे पेटेंट करण्यासाठी आम्ही अमेरिकेकडेही अर्ज केला आहे. सोबतच, या जैवइंधनाचा वापर करण्यात यावा तसेच या शोधाला व्यावसायिक रूप देण्यासाठी केंद्र सरकारसोबतही संपर्क साधला आहे, असे सांगताना ते म्हणाले की, जवळपास १० हजार लिटर खोबरेल तेलापासून ७६० लिटर जैवइंधन तयार करणे सहज शक्य आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या ‘फ्युएल’ या जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित झाला आहे.
डिझेलला पर्याय ठरत असलेल्या या जैव इंधनाची प्रतिलिटर किंमत ४० रुपये इतकी असू शकते. दरम्यान, कोचीच्या शास्त्रज्ञांनी खोबरेल तेलापासून जैव इंधनाचा लावलेला शोध आम्ही बघितला आहे आणि त्याचा अभ्यासही केला आहे. मात्र, हा शोध पुढे नेण्यासाठी नारळ विकास समितीकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे संपर्क केला आहे, अशी माहिती नारळ विकास समितीचे अध्यक्ष टी. के. जोस यांनी दिली.