किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=अभ्यासाचा निष्कर्ष=
शिकागो, [२२ फेब्रुवारी] – चांगली नोकरी मिळविण्यासाठी युवावर्गाची सतत धडपड सुरू असते. त्यासाठी अनेक क्लृप्त्याही लढविल्या जातात. दर्जेदार स्वपरिचय अर्थात बायो डेटा तयार करण्यासाठी काही संस्थांमधून मार्गदर्शनही केले जाते. पण, एका नव्या संशोधनानुसार, छापील किंवा लिखित स्वपरिचयाऐवजी ध्वनिमुद्रित स्वपरिचय देणार्या उमेदवाराची निवड करण्यास व्यवस्थापन किंवा निवड मंडळ प्राधान्य देते.
शिकागो विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्राध्यापक निकोलस एप्ले यांनी आपल्या अभ्यासक चमूच्या मदतीने केलेल्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या अध्ययनानुसार, छापील स्वपरिचयात नोंदविलेला अनुभव किंवा कौशल्य निवड मंडळाला उमेदवाराकडे आकर्षित करतो. पण, ध्वनिमुद्रित स्वपरिचयाच्या माध्यमातून उमेदवाराचा आवाज अधिक प्रभावित करतो. आधुनिक पद्धतीच्या या स्वपरिचयामुळे उमेदवार आपल्या आवडीची नोकरी मिळवू शकतो.
एप्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या विषयावर त्या व्यक्तीचे विचार आवाजातून अधिक चांगल्या प्रकारे दिसून येतात. आवाजातून त्या व्यक्तीची तार्किक आणि बौद्धिक क्षमता तसेच चिंतनशक्तीचाही अंदाज घेता येतो. या अभ्यासासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमासह इतर विद्यार्थ्यांना छापील आणि ध्वनिमुद्रित असे दोन्ही प्रकारचे स्वपरिचय तयार करण्यास सांगण्यात आले. या दोन्ही प्रकारच्या स्वपरिचयांमुळे निवड मंडळावर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी, ध्वनिमुद्रित स्वपरिचयाला सर्वाधिक पसंती मिळाली आणि संबंधित उमदेवारांना नोकरीची संधीही. या निष्कर्षामुळे कार्यक्षेत्रात स्पष्ट उच्चार आणि आवाजाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.