किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.28°से. - 31.15°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश=आता रांग लावण्याची गरज राहणार नाही=
मुंबई, [११ जानेवारी] – आपल्या तक्रारी घेऊन किंवा अन्य कामानिमित्त मंत्रालयाची पायरी चढणार्या महाराष्ट्रभरातील नागरिकांना आता मोठमोठ्या रांगांमध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. येत्या १५ तारखेपासून त्यांना केवळ ऑनलाईन नोंदणी करून थेट मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही अभिनव योजना अंमलात आणण्याचे जाहीर केले आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. हस्तलिखित प्रवेश पावती भरण्यासाठी मंत्रालयाबाहेर लांब रांगा लावण्याऐवजी भेटीस येणार्यांना आता आपल्या घरातच बसून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचे प्रिंट त्यांना लगेच प्राप्त होईल. सोबतच एसएमएसही येईल. प्रिंट किंवा एसएमएस दाखवून त्यांना मंत्रालयात सहज प्रवेश करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करताना मंत्रालयात जाण्यामागील आपला उद्देश लोकांना नमूद करावा लागणार आहे.
राज्याच्या काना-कोपर्यातून अनेक नागरिक मंत्रालयातील मंत्री आणि अधिकार्यांना भेटण्यासाठी येत असतात. त्यामुळे मंत्रालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर लांबच लांब रांगा लावून प्रवेश पास घ्यावा लागतो. या समस्येवर सरकारनेच आता तोडगा काढला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर १५ जानेवारीपासून एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकवर जाऊन पास भरायचे आहे. त्याचे प्रिंट काढून मंत्रालयात जाता येणार आहे. प्रिंट नसल्यास मोबाईलवरचा मॅसेज दाखवून प्रवेश करता येणार आहे. प्रवेश पास देण्यासाठी दोन्ही प्रवेशद्वारांवरील खिडक्यांची संख्याही वाढवली जाणार आहे.