किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.74° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.74° से.
22.37°से. - 25.6°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
बुधवार, 15 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल25.3°से. - 27.1°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलन्यूयॉर्क, [४ नोव्हेंबर] – जन्म आणि मृत्यू हे या भूतलावरील कुणाच्याही हातात नाही, हेच निर्विवाद सत्य आहे. जन्माला आल्यानंतर आपण नेमके किती वर्ष जगणार, हे सांगणे तसे अगदीच कठीण आहे. पण, सावधान… तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमधून एक आगळावेगळाच ‘ऍप’ विकसित होत आहे. त्याचे नावच ‘डेडलाईन’ असे ठेवण्यात आले असून, हा ऍप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट उपकरणांचे विश्लेषण करून ‘आपण नेमके किती दिवस जगणार आहोत,’ याची माहिती देणार आहे!
या आयफोनच्या ‘हेल्थकिट’मध्ये आपली उंची, डायस्टोलिक रक्तदाब, आपली झोप आणि दिवसभरातील आपल्या शारीरिक कार्याचा रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. ‘डेडलाईन’ ऍप याच रेकॉर्डमधील माहितीचा आधार घेऊन आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित काही प्रश्नांच्या आधारे आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ ठरवणार आहे.
‘ऍप’चा निर्माता असलेल्या गिस्ट एसएससी या कंपनीने ऍपल आयट्युन पेजवर असे नमूद केले आहे की, कोणताही ऍप आपल्या मृत्यूची तारीख आणि वेळ अगदी तंतोतंत देऊ शकत नाही. मात्र, हे ऍप तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यावर लक्ष ठेवून, आपल्या सुदृढ जीवनासाठी प्रेरित करणार आहे. सोबतच, गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा, असा सल्लाही वेळोवेळी देणार आहे.