किमान तापमान : 27.78° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.73°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [३ मार्च] – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना युती सरकारने दिलासा दिला आहे. ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे त्यांना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता सरकारच्या तिजोरीतून मदत देण्याचा निर्णय मंगळवार, ३ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. मात्र, गेल्यावर्षीच्या दुष्काळ आणि गारपीटग्रस्त शेतकर्यांना ही मदत मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अवकाळी पावसाच्या विषयाला प्राधान्य देण्यात आले. एका पाठोपाठ एक येणार्या अस्मानी संकटांनी हैराण झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत करा, अशी एकमुखी मागणी मंत्र्यांनी केली. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीचे प्राथमिक अंदाज मंत्रिमंडळासमोर सादर केले. १ मार्चपर्यंत राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सात लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तसेच फळबागांना बसला आहे. यामध्ये ६.९ लाख हेक्टर शेतीचे तर, १.४० हेक्टर जमिनीवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. यात ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी रब्बी पिकांबरोबरच आंबा, काजू, द्राक्षे, डाळिंब, केळी या फळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात चार हजार १०० क्विंटल बेदाणा पावसात भिजून खराब झाला. या पावसात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. तर १०५ जनावरे दगावली असून, १९४ घरांची पडझड झाली असल्याचे खडसे यांनी सांगितले. शेतीसह या सर्व नुकसानीचे पंचनामे करून लगेचच मदतीबाबत निर्णय घेतले जातील. पुढील सोमवारी सुरू होणार्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मदतीबाबतची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राच्या निकषांनुसार मदत नाही
राज्यात पडलेला अवकाळी पाऊस हा पासष्ट मिलिमीटरपेक्षा अधिक झालेला नाही, त्यामुळे केंद्र सरकारच्या निकषांनुसार कोणतीही मदत मिळू शकणार नाही हे लक्षात घेऊन, ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले असेल त्या बाबतचे पंचनामे तातडीने केले जातील आणि नंतर राज्य सरकार आपल्या तिजोरीतून मदत करेल, असा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. मात्र, गेल्यावर्षी दुष्काळ व गारपीटग्रस्त शेतकर्यांना दोन हजार कोटींचे वाटप केले आहे, अशा शेतकर्यांना अवकाळी पावसाची मदत दिली जाणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी दुष्काळामुळे ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे, अशी २४ हजार ७९८ गावे घोषित केली होती, असेही खडसे यांनी सांगितले.