किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल= नासाच्या ‘अपॉच्युर्निटी’ शोध=
वॉशिंग्टन, (२५ जानेवारी) – मंगळावर जीवसृष्टी होती काय, तिथे जीवन जगण्यासाठी उपयुक्त पाणी होते काय,यासह विविध मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने पाठविलेल्या ‘अपॉच्युर्निटी’नावाच्या रोव्हरने अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. तब्बल चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर मानवी जीवनाकरिता उपयुक्त असे पाणी उपलब्ध होते,असे या अभ्यासात दिसून आले आहे.
या रोव्हरने मंगळवारील काही खडकांचे नमुने नासाकडे पाठविले आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी या खडकाच्या नमुन्यांचे परीक्षण केेले असता, मंगळावरही चार अब्ज वर्षांपूर्वी मानवी जीवन अस्तित्त्वात होते, असे स्पष्ट झाले असल्याची माहिती नासाच्या प्रवक्त्याने दिली. मंगळाचा पृष्ठभाग अतिशय थंड असला, तरी आताही तिथे मानवी जीवनासाठी उपयुक्त अशा पाण्याचे साठे आताही असावेत,असे नासाला वाटते.
‘अपॉच्युर्निटी’ने केवळ एकाच ठिकाणचे नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणांवरील छायाचित्रे पाठविले आहेत.या छायाचित्रांमध्येही पाण्याचा अंश असल्याचे दिसून आले आहे. कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाणी आहे,असे हा अभ्यास करणार्या कॉर्नेल विद्यापीठागचे प्राध्यापक स्टीव्हन स्क्वेअर्स यांनी सांगितले.
तथापि, या पाण्यात कोणकोणते घटक आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अभ्यास केल्यानंतरच त्याचे उत्तर मिळू शकणार आहे. हे पाणी खनिजयुक्त किंवा व्हिनेगरसारखे आम्लयुक्त असू शकते. अभ्यास सुरू आहे. पाण्यासोबतच मानवी जीवसृष्टीविषयी उपयुक्त माहितीही यातून मिळण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.