किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलछत्रपती संभाजीनगर, (१७ सप्टेंबर) – आमच्याकडून एखादा निर्णय मागे राहिला तर, तो घेण्याची किंवा आम्ही घेतलेले निर्णय पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? असा खडा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला केला.
फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजीनगरमध्ये घेतली होती, त्या बैठकीतील जवळपास सर्व निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे. त्याची माहिती आम्ही पत्रकारांना देणार आहोत. परंतु, आज जे लोकं म्हणत आहेत की, मागच्या बैठकीत काय झाले, त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षांत तुम्ही मराठवाड्यासाठी काय केले, तुम्ही सरकारमध्ये होता ना.
मराठवाडा वॉटरग्रीडचा मुडदा पाडला
मराठवाडा वॉटरग्रीडचा मुडदा पाडण्याचे काम ज्या सरकारने केले, आता तेच आम्हाला प्रश्न विचारत आहेत. मराठवाड्याला जे दिले होते, त्याचाही या लोकांनी मुडदा पाडला आहे. मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर, ती हाणून कशी पाडायची, हा यांचा कावा आहे, हे कावेबाज लोक आहेत, अशा शर्ब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.