किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– महादेव अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई,
मुंबई, (१५ नोव्हेंबर) – मुंबईतील माटुंगा पोलिसांनी ‘महादेव अॅप’ प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी महादेव या सट्टेबाज अॅपच्या प्रवर्तकासह अन्य ३२ जणांविरोधी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन आणि मोहित बर्मन या दोन उद्योगपतींचाही सहभाग आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी अॅपच्या प्रवर्तकासह ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संबंधित संशयितांवर जुगार आणि फसवणूक प्रकरणातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(बी) या कलमांचा समावेश आहे. महादेव अॅप प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे संचालक गौरव आणि अध्यक्ष मोहित बर्मन यांच्यादेखील नावांचा समावेश आहे तसेच इतर अनेक दिग्गज नावांचा या यादीत समावेश असल्याचेही देखील माध्यमांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महादेव बुकिंग अॅपवर बंदी घातली. हे अॅप ईडीच्या चौकशीत असून, या प्रकरणी ईडीने छत्तीसगडमधून दोन पोलिसांनाही अटक केली आहे. आठवड्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार महादेव बेटिंग अॅपबाबत मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला. या एफआयआरच्या प्रतीमध्ये आरोपी क्रमांक १६ आणि आरोपी क्रमांक १८ हे उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन आहेत.