किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल– शरद पवार यांची टीका,
पुणे, (२८ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संसदेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी करण्यात आलेले विविध विधी देशाला अनेक दशके मागे नेत असल्याचे दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक स्वभाव असलेल्या समाजाची कल्पना केली होती. परंतु, नवीन संसदेच्या लोकार्पण समारंभात जे घडले, ते त्याच्या उलट होते. नेहरू यांनी आधुनिक भारताची संकल्पना मांडणे आणि आज नवी दिल्लीतील नवीन संसद भवनात पार पडलेल्या विधींच्या मालिकेत खूप फरक आहे. आपण आपल्या देशाला कित्येक दशके मागे नेत आहोत, असे वाटत असल्याचे शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.
विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. वैज्ञानिक स्वभावाचा समाज निर्माण करण्याच्या इच्छेबाबत नेहरू ठाम होते. मात्र, आज संसदेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण समारंभात जे घडत आहे, ते नेहरूंच्या कल्पनेच्या अगदी उलट आहे, असे पवार म्हणाले.