किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली.
देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. एनसीसीएफने दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड, एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही चंद्रा यांनी सांगितले. एनसीसीएफच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ फिरत्या व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूग डाळ आणि तांदूळ देखील अत्यल्प दरात खरेदी करणार असल्याची ही माहिती चंद्रा यांनी यावेळी दिली.