किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.58°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल– तीन वेळा नापास शिक्षकाची किमया,
पुणे, (२७ एप्रिल) – गणिताचा आणि विद्यार्थ्यांचा कायमच छत्तीसचा आकडा असतो. फार कमी विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो. त्यातच गणिताच्या सूत्रांचे पाठांतर अनेक विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणे काम असते. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील अभिजित भांडारकर नावाच्या शिक्षकाने गणिताची १०८० सूत्रे संगीताच्या तालावर गुंफली आहेत. अभिजित भांडारकर तीन वेळा गणितात नापास झाले होते, हे विशेष. अभिजित भांडारकरांच्या या सांगितीक वर्गात विद्यार्थीही आनंदाने धडे घेत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना स्वत: भांडारकर गणितात तीन वेळा नापास झाले होते. शालेय जीवनात त्यांचा गणिताचा बेस कच्चा राहिल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावली होती. अशी वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून हा विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा विडा त्यांनी उचलला.
त्यातून संगीताच्या तालावर धडा देण्याची संकल्पना समोर आली. अगदी दोन विद्यार्थ्यांना घेऊन खाजगी तासिका सुरू केलेल्या भांडारकरांकडे आज पाचशेहून अधिक विद्यार्थी धडे गिरवत आहेत. गणिताचे धडे देण्याच्या या अनो‘या संकल्पनेची दखल इंडिया, एशिया आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. अभिजित भांडारकरांनी गाणे तयार केले आहे. मात्र, त्यांनाही त्यांच्या विद्यार्थिदशेत गणित विषय कधीच आवडला नाही. गणितातील कठीण सूत्र पाठ करणे त्यांच्यासाठी कंटाळवाणे काम असायचे, त्यामुळे त्यांना गणित विषयात कधीही रुची वाटली नाही. त्यामुळे गणितात ते सलग तीन वर्षे नापास झाले. अभियांत्रिकीचा अभ्यास सोडावा लागल्याने त्यांनी आत्मविश्वास गमावला होता.
पहिली ते अभियांत्रिकीची सूत्रे गाण्यात
अभिजित भांडारकरांनी इयत्ता पहिलीपासून ते अभियांत्रिकीपर्यंतची सुमारे १०८० सूत्रे गाण्याच्या चालीवर बसवली आणि यातून आता ते विद्यार्थ्यांमध्ये गणिताची रुची निर्माण करत आहेत. रॅप, वेस्टर्न, भांगडा, जॅझ, साल्सा या प्रकारांत त्यांनी सूत्रांची मांडणी केली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे शिकणार्या विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण गणितात प्राप्त केले आहेत.