किमान तापमान : 26.62° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.58°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलपुणे, (१६ एप्रिल) – लहान लहान गावांमध्ये जत्रा, उरूस यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून पुस्तकांची विक्री करावी. राष्ट्रीय विचारांची पुस्तके सर्वत्र उपलब्ध व्हावी, त्यातून वाचन संस्कृती विकसित होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. शरद कुंटे यांनी केले. भारतीय विचार साधना फाऊंडेशनचे अद्ययावत कार्यालय, पुस्तक विक्री केंद्राचे नूतनीकरण आणि पूनर्शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. कुंटे म्हणाले, राष्ट्रीय विचारांचा प्रसार करताना पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी जर छोट्या गावपातळीपर्यंत ती उपलब्ध झाली तर, वाचन संस्कृती आणि सुयोग्य जडणघडण होण्यास मदतच होते. बौद्धिक विकास करणारे साहित्य निर्माण करीत भाविसा आणि वाचकांचे एक नाते तयार झाले आहे. सामाजिक भान जागृत करणारे साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवायला हवे, असे मत याप्रसंगी रवींद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केले.