|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » फिचर, महाराष्ट्र » जीवनशैलीतच दडलेय् हृदयाचे आरोग्य

जीवनशैलीतच दडलेय् हृदयाचे आरोग्य

आज जागतिक हृदय दिन,
नागपूर, २८ सप्टेंबर – हृदयाची धडधड म्हणजे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. ही धडधड बंद झाली की, माणूसही संपतो. म्हणून सर्व विकारांमध्ये सर्वाधिक काळजी घेतली जाते ती हृदयविकाराची. जगातील सर्वाधिक मृत्यू हृदयविकारानेच होत असल्याची बाब यापूर्वीच सिद्ध झाली आहे. सोबतच हृदयविकारासाठी वयाचीही मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे यापासून बचाव करायचा तर आपली जीवनशैली अधिकाधिक हृदयानुकूल ठेवली पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात.
हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो.
जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला १९९९ मध्ये मान्यता मिळाली. जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (१९९७-९९) आंतोनियो लुना यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला.
उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. २०११ पासून २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
जागतिक आकडेवारीनुसार, हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. बहुतांश व्यक्ती हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हृदयरोग पीडितांचे वयोमान दिवसेंदिवस कमी होत आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीही बरेच लोक हृदयविकाराने ग्रस्त होताहेत. पुढील पाच ते दहा वर्षात एकूण भारतीय लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के भाग हा हृदयरोगाने त्रस्त असेल, असाही अंदाज आहे. मुळात आजची तरुणाई नोकरी किंवा व्यवसायात अनियमित तासिकात काम करते. याच कारणाने त्यांच्यात तणाव वाढतो. बर्‍याच जणांना घरचे सकस अन्नही मिळत नाही. त्यात चुकीच्या जीवनशैलीचा स्वीकार केल्याने शरीरावरील आघात वाढले आहेत. मग तो व्यायामाचा, मोबाईलचा अतिरेक असो किंवा जंकफूडचे अतिरिक्त सेवन असो, या सर्वच गोष्टी हृदयासाठी घातक सिद्ध होतात.
सिद्धार्थ शुक्ला हृदयविकाराचा बळी
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू तरुणाईसाठी जागरूक राहण्याचा संदेश देणारा आहे. त्याच्या मृत्यूमागे व्यायामाचा अतिरेक, कामाचा अतिताण, आहाराकडे दुर्लक्ष अशा काही प्राथमिक कारणांचे स्पष्टीकरण दिले जात आहे. मात्र, त्याचे इतक्या लहान वयात जाणे हृदयविकाराच्या दृष्टीने धोक्याची घंटा समजली पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात.

Posted by : | on : 28 Sep 2021
Filed under : फिचर, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g