किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 29.54° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.54° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, (८ जून) – कर्नाटक निवडणुकीनिकालानंतर विरोधकांचे लक्ष २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. याबाबत महाआघाडीकडून विविध रणनीती अवलंबल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की,कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता लोकांना बदल हवा आहे, असा दावा त्यांनी केला. हीच लोकांची मानसिकता राहिली तर आगामी निवडणुकीत देश बदललेला दिसेल, असे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, जिथे काँग्रेस पाच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेवर आली.
देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पुढील वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. शरद पवार म्हणाले की, परिस्थिती पाहता मला वाटते की भाजपविरोधी लाट उसळली आहे. कर्नाटक निवडणूक निकाल पाहता लोक बदलाच्या मूडमध्ये आहेत. लोकांची ही मानसिकता अशीच राहिली तर देशात परिवर्तन घडेल. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. शरद पवार यांना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणि अलीकडच्या काळात झालेल्या हिंसाचाराच्या काही घटनांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनीही राज्यातील शेतीविषयक प्रश्नांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, कापूस उत्पादक शेतकर्यांची स्थिती गंभीर आहे. कापूस खरेदी व्हायला हवी होती पण ती झाली नाही. शेतकर्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी असेल. सरकारचा दृष्टिकोन म्हणावा तसा सकारात्मक नाही, असे शरद पवार म्हणाले. निर्यातीसाठी कोटा निश्चित नाही आणि दुसरीकडे साखरेचे दर घसरत आहेत. ते म्हणाले की, सध्याची अर्थव्यवस्था कृषी उत्पादकांसाठी फायदेशीर नाही.