किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१५ फेब्रुवारी ) – बाळासाहेब थोरात मला सोडून सर्वांना भेटतात, ते नाराज आहेत का, हे तुम्हालाच सांगतील… असे सांगणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर दिल्लीतील नेत्यांनी दिलेल्या कानपिचक्यांनंतर बाळासाहेब थोरातांबरोबर दिलजमाई केली. दिल्लीश्वरांच्या इशार्यानंतर पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी या दोन्ही नेत्यांमधील कटुता तोंडदेखली तरी दिसणार नाही, हे निश्चित केले.
विधानसभेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यामुळे थोरात आणि पटोले यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर थोरात यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला. त्यानंतर दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीने हालचाली करून राज्य काँग्रेसमधील बेदिली थोपविण्यात यश मिळवले. एच. के. पाटील यांनी थोरात यांचा राजीनामा फेटाळल्याचे जाहीर केले तसेच थोरात यांच्याबरोबर त्यांच्या घरी एकांतात दीर्घ चर्चा केली. त्यानंतर थोरात यांनीही आपली तलवार म्यान केली.
मुंबईत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते. त्यानंतर पटोले, थोरात, अशोक चव्हाण यांनी एकत्रित पत्रपरिषद घेत पक्षांतर्गत कोणतेही वाद नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. थोरात व आपल्यात कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्र आहोत. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीतील नागपूर व अमरावतीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी भाजपाने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले व माध्यमांनी त्याला हवा दिली, असे वक्तव्य करीत पटोले यांनी कुरबुरीचे खापर भाजपा आणि माध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केला.
अमरावती निकाल फिरवण्यासाठी ५० कोटी देण्याचा प्रयत्न झाला
अमरावतीतील निकाल फिरवण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याचा प्रयत्न झाला हाहेता. मी कमिशनरला इशारा दिला आणि ते टळले, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केलाहे. ही रक्कम नंतर १०० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता होती, असे नाना पटोले म्हणाले.