किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल-मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन,
मुंबई, (०९ ऑगस्ट) – देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवत आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात् ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणार्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार आदी यावेळी उपस्थित होते.
महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवली. अशा अगणित हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप आपण ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमाने करीत आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम : उपमु‘यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ९ ऑगस्ट हा स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना नमन करण्याचा दिवस आहे. आपण या ठिकाणी वृक्षारोपण करून, देशाचा तिरंगा फडकवून आणि आपल्या मातीला नमन करून सुरुवात केली आहे. आपण नागरिक म्हणून देशाला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण करू. या अभियानाच्या माध्यमातून गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम सुरू झाले आहे.
विकासाची ज्योत तेवत ठेवा : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे लोकआंदोलन ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झाले. या स्वातंत्र्यसैनिकांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी त्याग केला. ही देशभक्ती आणि विकासाची ज्योत तेवत राहील आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. देशाच्या प्रगतीत अनेकांचे योगदान आहे.