किमान तापमान : 27.5° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.31°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल– ३ वर्षांतील आकडेवारी जाहीर,
मुंबई, (१६ एप्रिल) – गेल्या वर्षी महाराष्ट्रात रस्ते अपघातात एकूण १४,८८३ लोकांचा मृत्यू झाला होता, जो २०१९ च्या कोरोनापूर्वीच्या वर्षात नोंदलेल्या १२,७८८ मृत्यूंच्या तुलनेत २,०९५ ने अधिक आहे. गेल्या वर्षी राज्यात ३३,०६९ रस्ते अपघात झाले, तर २०१९ मध्ये ३२,९२५ अपघातांची नोंद करण्यात आली. २०१९ च्या तुलनेत २०२२ मध्ये अपघातांच्या संख्येत ०.४४ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, मृतांची सं‘या १६.३८ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत अपघातातील जखमींची संख्या २८,६२८ वरून २७,२१८ झाली आहे.
शनिवारी राज्यातील रायगड जिल्ह्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पारंपरिक संगीत पथकातील तरुण स्त्री-पुरुषांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने पाच अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाल्यामुळे रस्ते अपघातांच्या प्रश्नाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ४२ जणांसह खाजगी बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना वळणावर असलेल्या बोर घाट पर्वतीय खिंडीत खंडाळा घाट म्हणून ओळखल्या जाणार्या ३०० फूट खोल दरीत कोसळली.
२०२० मध्ये कोरोना साथीचा उद्रेक आणि टाळेबंदीमुळे वाहनांची वाहतूक बंद असताना महाराष्ट्रात रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते; परंतु २०२१ मध्ये ही संख्या वाढली आणि २०२२ मध्ये संख्यावाढ कायम राहिली. राज्यात २०२० मध्ये २४,९७१ च्या तुलनेत २०२२ मध्ये ८,०९८ अधिक रस्ते अपघात वाढले. २०२१ मध्ये २९,४७७ च्या तुलनेत ३,५९२ अधिक आहेत. २०२० मध्ये ११,५६९ पेक्षा गेल्या वर्षी राज्यात रस्ते अपघातात १,९५९ अधिक मृत्यू आणि २०२१ मध्ये १३,५२८ अपघातात १,३५५ पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, याशिवाय जखमींच्या संख्येतही अशीच वाढ झाली आहे.