किमान तापमान : 31.65° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 5.41 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
28.72°C - 32.03°C
broken clouds28.59°C - 30.85°C
scattered clouds28.63°C - 30.61°C
scattered clouds28.59°C - 30.22°C
scattered clouds28.52°C - 30.88°C
light rain28.92°C - 30.67°C
light rainपुणे, (१४ नोव्हेंबर) – राज्यासह देशात गुलाबी थंडीला चाहूल लागली असली तरी, मधेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यासह देशभरातवरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत.
हवामान खात्यानुसार, आगामी २४ तासात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, आंध्रप्रदेशमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या किनारपट्टीच्या प्रदेशात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात जोरदार पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने तामिळनाडू, पुद्दुचेरीसह कराईकलसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.