किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (११ जुन) – महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून चार बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्वजण बनावट कागदपत्रांद्वारे अनेक दिवसांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते. या चार बांगलादेशींचा एक साथीदार बनावट भारतीय कागदपत्रांद्वारे सौदी अरेबियात पळून गेला. हा बांगलादेशी गुजरातमध्ये राहून बनावट पासपोर्ट बनवत असे, असे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.
यावेळी बांगलादेशी नागरिकांनी या बनावट पासपोर्टचा वापर करून लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचेही तपासात समोर आले आहे. बनावट पासपोर्टचा वापर करून काही बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिक असल्याचे दाखवून परदेशात नोकरी करत असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी एटीएस अजूनही पाच जणांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या बांगलादेशींच्या संगनमताची माहिती महाराष्ट्र एटीएस काढत आहे.
आरोपींची नावे-
रियाझ हुसेन शेख, वय- ३३
सुलतान सिद्दीक शेख, वय- ५४
इब्राहिम शफिउल्ला शेख, वय- ४६
फारुख उस्मान गनी शेख, वय- ३९