किमान तापमान : 27.38° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.43 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
24.63°से. - 28.37°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.56°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.27°से. - 28.52°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.4°से. - 28.26°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर कुछ बादल25.53°से. - 28.58°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 28.95°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल– आधी म्हणाले, राकाँत फूट नाही, नंतर केले घूमजाव,
बारामती, (२५ ऑगस्ट) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि अजित पवार अजूनही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी घेतली. यामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असताना, काही वेळातच आपण असे बोललोच नाही, असे घूमजाव शरद पवार यांनी केले.
आमच्या पक्षातील काही नेत्यांनी वेगळा मार्ग निवडला. ते सरकारमध्ये सहभागी झाले. याचा अर्थ पक्षात फूट पडली, असा होत नाही, असे पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे, तत्पूर्वी सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते असल्याचे सूतोवाच केले होते. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, शरद पवार म्हणाले की, सुप्रिया यांनी काहीच चुकीचे वक्तव्य केले नाही. अजित पवार आजही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही.
लगेच बदलली भूमिका…
यानंतर काही वेळातच शरद पवार यांनी आपल्या भूमिकेवरून घूमजाव केले. अजित पवार आमचे नेते असल्याचे मी म्हणालो नाही. सुप्रिया ही अजित पवारांची धाकटी बहीण आहे. बहीण-भाऊ सहजपणे बोलत असतील तर, त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षातील एखादा मोठा गट फुटला असेल तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला, त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार पक्षात परत येतील का, या प्रश्नाचे अप्रत्यक्ष उत्तर दिले.
अजित पवार म्हणतात, नो कमेंट्स
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे उत्तर दिले. सध्या मला यावर काहीच बोलायचे नाही, असे ते म्हणाले.
याचाच अर्थ फूट पडली : संजय राऊत
शरद पवारांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिकि‘या दिली. अजित पवार गटाने शरद पवारांची हकालपट्टी केली, याचा अर्थ पक्षात फूट पडली असा होतो, असे संजय राऊत म्हणाले. अजित पवार गटाने भाजपासोबत हातमिळवणी केली, हा पक्षद्रोह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत. एक जयंत पाटील, दुसरे सुनील तटकरे. मग ही फूट नाही का?, लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही, असे संजय राऊत म्हणाले.