किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– सर्व बँकांना सरकारच्या सूचना,
मुंबई, (१४ मार्च) – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकर्यांना हा लाभ देण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य दिलीप मोहिते पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, डॉ. देवराव होळी, वैभव नाईक यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर सावे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या १२ लाख ८४ हजार शेतकर्यांना आतापर्यंत ४६८३.२ कोटी रुपये १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने थेट वितरित करण्यात आले आहेत.
उर्वरित पात्र शेतकर्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून, २ लाख ८२ हजार शेतकर्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १ हजार १४ कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली तसेच ही कार्यवाही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त स्तरावरून सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ३२ लाख ३ हजार शेतकर्यांना २०,४२५.१२ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, उर्वरित शेतकर्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सावे यांनी सांगितले.