किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशश्रीनगर, (१८ सप्टेंबर) – सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याच्या फक्त कल्पना करीत आहेत. मात्र, कितीही शेळ्या आणि मेंढ्या कळपाने आल्या तरी, त्या सिंहाशी लढा देऊ शकत नाही, असा जोरदार हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे चढविला.
श्रीनगरमधील एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे बोलत होते. विरोधकांच्या एकत्र येण्यावर माझा मुळीच आक्षेप नाही. मी एवढेच म्हणत आहे की, शेळ्या आणि मेंढ्यांचा कळप जंगलात एका सिंहासोबत लढा देऊ शकत नाही. सिंह हा सिंहच असतो आणि जंगलात त्याचेच राज्य असते, असे ते म्हणाले. भाजपाप्रणीत रालोआविरोधात लढा देण्यासाठी २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, याकडे लक्ष वेधले असता, आपण पंतप्रधान मोदी यांना पराभूत करू शकतो, अशी त्यांची कल्पना आहे. मात्र, विरोधकांमध्ये ती ताकद मला तरी दिसली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
अन्य एका प्रश्नावर ते म्हणाले की, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रे =सचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर महायुतीच्या सरकारला २१५ आमदारांचा पाठिंबा प्राप्त आहे. त्यामुळे माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही. महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकांकरिता काम करणार्या पक्षाचे सरकार हवे की फक्त घरात बसून राहणार्यांचे सरकार हवे, याचा निर्णय जनताच घेणार आहे.