किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– योगेश सोमण यांचे लेखन, दिग्दर्शन,
पुणे, (२४ फेब्रुवारी ) – मूक चित्रपटांपासून सुरू झालेला प्रवास कृष्णधवल, रंगीत ७०एमएम असा करीत थ्री डी आणि ८ डी पर्यंत पोहोचला आहे. दूरचित्रवाणीसह संपूर्ण मनोरंजन विश्व सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे बदलत गेले आहे. मोबाईलच्या काळात तर चित्रपट पाहण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी तळहाताएवढ्या डिस्प्लेचा आपण वापर करीत आहोत. आपण सध्या व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलो आहोत. आता याच तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करीत असून, हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा ऐतिहासिक चरित्रपट असणार आहे, अशी माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते आणि या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण, रिलायन्स अॅनिमेशनचे सीईओ तेजोनिधी भंडारे, सृजन विद्याव‘तचे उपाध्यक्ष अमित नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोष रासकर म्हणाले, मनोरंजनाच्या क्षेत्रात आज आमूलाग‘ बदल झाला आहे. सध्याच्या काळात व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि मेटावर्स हे शब्द आपण ऐकत आहोत. वास्तवाचा आभास निर्माण करू शकणार्या व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या मदतीने जगात काही चित्रपट निर्माण करण्यात आले. व्हीआर तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हेडसेट बॉक्सची गरज असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगाला ओळख करून देताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. सृजन निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार आहेत.
योगेश सोमण म्हणाले, सावरकर यांच्या जीवनावरील या ४५ मिनिटांच्या व्हर्चुअल रिअल चित्रपटात वीर सावरकर यांना दोनदा जन्मठेप झाली होती, त्यापैकी १९११ ते १९२१ या काळात सावरकर पोर्ट ब्लेअरवरील सेल्युलर जेल येथे बंदीवासात होते. सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी अनन्वित अत्याचार सहन केले, त्याशिवाय सावरकरांनी राजबंद्यांची क्रांतिकारकांची संघटना बांधली, साक्षरतेचा प्रसार केला, हिंदू शुद्धीकरणाची मोहीम राबवली, इतकेच नाही तर, पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी सावरकरांची मुक्तता करण्यासाठी एमडेन नावाची युद्धनौका धाडली होती. त्या काळात सावरकरांनी मार्सेलीससारखा निसटण्याचा प्रयत्न केला असेल का? हे सर्व चित्रण आमच्या या ४५ मिनिटांच्या चित्रपटात बघायला मिळेल. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठा खर्च असून, त्यासाठी एका ट्रस्टच्या माध्यमातून क्राऊड फंडिंग (निधी) उभारण्यात येणार आहे.