किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, (८ जून) – राज्यात दंगलसद़ृश स्थितीची भीती काही राजकीय नेत्यांनी वर्तविणे आणि एका विशिष्ट समाजातील लोकांनी औरंगजेब तसेच टिपू सुल्तानचे गुणगान गाणे हा योगायोग नाही. महाराष्ट्रात औरंगजेबाचे गुणगान आपले सरकार कदापि सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिला. नवी मुंबई येथे ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगजेबाचे छायाचित्र झळकविण्यासाठी तरुणांना कुणी प्रोत्साहित केले, याचा शोध लवकरच घेतला जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
मागील काही दिवसांपासून काही राजकीय नेते सातत्याने राज्यात दंगलसद़ृश स्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यातच काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी आज कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबाच फोटो झळकवले. हा योगायोग म्हणता येणार नाही. राज्यात अस्थिरता निर्माण करण्याच्या मोठ्या कटाचा हा एक भाग आहे. हे अचानक घडले नाही. कोल्हापुरात काही तरी भीषण होणार आहे, असे वक्तव्य अलिकडेच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याने करणे, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.