किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, (०४ सप्टेंबर) – मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार पदांसाठीची जाहिरात मंगळवारी निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही अनेक दिवसांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते, पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यात लक्ष घातले आणि या प्रक्रियेला सुरुवात केली. मागील आठवड्यात ही भरती सुरू होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
‘क’ आणि ’ड’ श्रेणीतील ११,९०३ जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत घेतली जाणार आहे.
गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.