किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलतंत्रज्ञान क्षेत्राचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत आहे. मुळे कारकिर्दीसाठी या क्षेत्राची निवड करणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या क्षेत्रात कारकिर्द करताना योग्य पर्यायांची चाचपणी करुन आणि जाहिरातींना न भूलता योग्य ते शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा. पदवी पूर्ण होण्याआधी किंवा उच्च शिक्षण घेताना कॉम्प्युटर आणि त्यातही ‘सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ हा पर्याय बहुतांश विद्यार्थी निवडताना दिसतात. पण, केवळ त्या क्षेत्राला वाव आहे म्हणून निवड करून चालत नाही. त्यासाठी सर्वांगी विचार करावा लागतो. संगणकातले विविध पर्याय निवडताना त्यातच कारकीर्द घडवायची असा अंतिम निर्णय सध्या तरी कोणी घेऊ शकत नाही. त्याला कारणीभूत आहे या क्षेत्रातील दररोज निर्माण होणारे नवीन पर्याय.
वर्षभरापूर्वी घेतलेलं प्रशिक्षण पुढच्या वर्षी कुचकामी ठरतं. नोकरी मिळवण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. मग पुढील शिक्षण घेण्यासाठी धावाधाव करायची. ते प्रशिक्षण विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये घेतलं तर नोकरीची अधिक चांगली संधी मिळते अशा आशयाच्या जाहिरातींना भुलून त्यासाठी हजारो रुपये खर्च करायचे.हे चक्र चालूच राहतं. त्याला अंत नाही. तरीही या क्षेत्राकडे येणार्यांचा ओघ आटलेला नाही. या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. ‘व्हाईट कॉलर जॉब’ मिळण्याची खात्री आहे आणि आज ना उद्या परदेशागमनाची संधी आहे हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन या क्षेत्रात येणार्यांची संख्या वाढत आहे.पण ही संधी नक्की कोणतं प्रशिक्षण घेतल्यावर मिळते याचं चित्र बर्याच जणांना स्पष्ट होत नाही. मग वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं घेत राहणं हाच एक पर्याय त्यांच्यासमोर उरतो.
संगणकाच्या भाषेत जसजशी नवनवी व्हर्जन येतात तसतशी नोकरीच्या अपेक्षांमध्ये भर पडत जाते. आता केवळ मूळ व्हर्जन शिकून भागत नाही तर त्यापुढे ‘प्लस प्लस’ची जोड घ्यावी लागते. पण हे शिक्षण घेण्यासाठी किती वेळ आणि किती पैसा खर्च होतो याच्यावर कोणी ‘फारसा’ विचार करत नाही. विशिष्ट प्रशिक्षण घेतलं की अमूक एक हजाराची नोकरी हे सुखद चित्र डोळ्यासमोर दिसत असतं.पण या चित्रामागे असणार्या सावलीचा विचारही करायला हवा.
अजूनही सॉफ्टवेअरमध्ये नक्की कोणत्या पायाभूत शिक्षणाची गरज आहे याचं स्पष्ट चित्र समोर आलेलं नाही.त्यामुळे पदवीनंतर कोणतं प्रशिक्षण घ्यावं हे कोडं सुटत नाही. बरं, त्याबाबत आधीच्या लोकांकडून अनुभव घ्यावा म्हटलं तर त्यांचा अनुभव तोपर्यंत बाद झालेला असतो. त्यामुळे सद्यस्थितीत कोणतं प्रशिक्षण उपयुक्त हे स्वत:च ठरवावं लागतं.
कॉम्प्युटरमध्ये पैसा भरपूर आहे पण त्यासाठी अनुभवही तगडा लागतो. इथे नवशिकाऊंना फारसं स्थान नसतं. अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही त्यामुळे अनुभव घेता येत नाही अशी विचित्र परिस्थिती भेडसावते.त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये कारकीर्द घडवण्याआधी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज भासू शकते याचा अंदाज आधीच घ्यावा लागतो. या प्रशिक्षणात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.
सध्या ज्या भाषेचा वापर होत असतो त्यातील नवनवीन सुधारणा अंगिकारण्याची तयारी ठेवावी लागते. साधारणत: संगणक प्रशिक्षण घेताना त्याआधी कोणत्या शाखेची पदवी उमेदवाराने घेतली आहे हेदेखील तपासून पाहिलं जातं आणि त्यात अभियांत्रिकी, बीटेक आणि एमसीए अशी पार्श्वभूमी असणार्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे वाणिज्य किंवा शास्त्र शाखेची पदवी घेऊन सॉफ्टवेअरकडे वळणार्या विद्यार्थ्यांचं एका दृष्टीने नुकसानच होतं.कारण त्यांच्या पदवीच्या अभ्यासक्रमाचा अनुभव इथे ग्राह्य धरला जात नाही. पदवीनंतर दोन-तीन वर्ष संगणक प्रशिक्षण घेऊन, त्यासाठी पन्नास-साठ हजार रुपये घालवून मिळणारी नोकरी दोन-अडीच हजार रुपयांची असेल तर त्याचं औचित्य काय ? याखेरीज इतकी वर्ष गुंतवलेला पैसा आणि वेळही वाया जातो.त्यानंतर दिली जाणारी कामं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचीच असतात याची खात्रीही कोणी देत नाही. ज्या प्रकारची कामं दिली जातात त्यासाठी आवश्यक असणारं संगणकाचं ज्ञान घेण्यासाठी दोन-तीन वर्ष खर्च करण्याची खरंच गरज असते का ?
याऐवजी जुजबी ज्ञान घेऊनही ती कामं करता येऊ शकतात. पण एवढा विचार करण्याची वेळ निघून गेलेली असते.त्यामुळे सॉफ्टवेअरच्या अभ्यासक्रमांची निवड करताना त्यातील अनिश्चितता,त्यातील वाढती मागणी, बदलतं ज्ञान यांचा बारकाईने विचार करायला हवा.