किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवीनवर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष तुम्हा सर्वांनासुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यपूर्ण, यशस्वीआणि समाधानाचे जावो…
जुने वर्ष सरत आले की, अगदी शेवटी सुरुवात होते ती या वर्षीचे न्यू इयर रिझॉल्यूशनकाय असावे?
लवकर उठेन, कमीत कमी तीन तास दररोज अभ्यास करेन, व्यायाम करेन, धावायला जाईन, शिव्या देणार नाही, रागावर नियंत्रण आणेन, मोठ्यांना दुखावणार नाही, सिगारेटी पिणार नाही/ कमी करेन, हे खाणार नाही, ते नेहमीकरिता सोडेन… इत्यादी इत्यादी. पण, हे रिझॉल्यूशन्स म्हणजे शेवटी संकल्पच ना!
अगदी फार जुन्या काळापासूनच संकल्पांचे आपले एक महत्त्व आहे. संकल्प करणे मग तो पूर्ण झाला की, संकल्पसिद्धी, उत्सवाप्रमाणे साजरी करणे इत्यादी. पण, जेव्हा आपण या काळात विचार करतो तेव्हा मला तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, संकल्प केल्याने आपल्याच आत्मविश्वासात वाढ होते आणि संकल्प पूर्ण करण्याच्या निमित्ताने आपल्यात एखादे कार्य सातत्याने करायची सवय लागते.
ध्येयपूर्तीसाठी संकल्प करणे आणि तो तडीस नेण्याकरिता सातत्याने आणि नेमाने त्यावर कार्य करणे, ही अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. कोणताही धर्म असो, त्यात व्रत, वैकल्ये, उपवास दिलेलेच आहेत. काही धर्मांत संकल्पांचे सादरीकरण आणि साजरीकरण हे उत्सवाच्या रूपाने, महाप्रसादाच्या रूपाने, लंगर, बलिदान (कुर्बानी)… रूपे अनेक असतील, पण विचाराअंती असे वाटते की, शेवटी ध्येय हे एकच असावे की, प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात नियमितता आणि सातत्य हे यायलाच हवे आणि असायलाच हवे आणि ते असावे आणि रुजावे म्हणूनच कदाचित नेमांची आणि संकल्पांची संकल्पना अस्तित्वात आली असावी.
मग बॉस, क्या है आपका न्यू इयर रिझॉल्यूशन? करा रे, खरंच करा, काहीतरी संकल्प आणि द्या स्वत:लाच दाखवून की, देखो, करून दाखवलेच ना जे ठरवले होते ते! नाही मित्रांनो, प्लीज डोंट टेक इट लाईटली. टेक युवर रिझॉल्यूशन व्हेरी सीरियसली, ऍज अ चॅलेंज. दाखवून द्या. फक्त ठरवायची देरी हैं मेरे दोस्त. आम्ही पण पूर्ण ‘दबंग’ आहोत, याही बाबतीत. जे ठरवतो ते तर करतो आणि ठरवलेले पूर्ण केले तर आमचे हातून असे काही मोठे अनासायास होऊन जाते की, भले भले तोेंडात बोेटे घालायला लागतात. आम्ही, म्हणजेच आजची तरुणाई आहेतच असे.
मित्रांनो, आयुष्यात आत्मविश्वासाला पर्यायच नाही. आत्मविश्वासाशिवाय सकारात्मकता आणि ध्येयपूर्ती अशक्यच आहे आणि मंत्र छोटा, तंत्र सोपं आहे हे की, सुरुवातीला छोटे, सोपे आणि झेपतील असेच संकल्प करावे, ते मग नेमाने आणि सातत्याने पूर्ण करावे. ते पूर्ण झाले की, आत्मविश्वास वाढतो. मग आपल्यालाच जाणवते की, आपण आपल्या क्षमतेला अंडरएस्टिमेट करत होतो. मग आपला आत्मविश्वास वाढतो आणि मग आधी ‘अबब!’ वाटणारा संकल्प सहज होऊन जातो. आपण तेच असतो, बदलला असतो तो स्वत:च्या बद्दलचा ऍटिट्यूड!
कसं आहे मित्रांनो, आधी संकल्प, मग एकदा तो केला की, सातत्याने तो पूर्ण करणे म्हणजेच ‘नेम’ आणि मग असा कसा मी माझाच संकल्प पूर्ण करणार नाही? म्हणजे जिद्द, म्हणजेच
अल्टिमेटली ‘निश्चय!’
व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तित्व मग ती स्त्री असो वा पुरुष, ते रुबाबदारच असायला हवे.चेहर्यावर शिक्षणाचे,संस्काराचे आणि आत्मविश्वासाचे तेज तर असायलाच हवे,तेव्हाच आपली साधी पर्सनॅलिटी ही इतरांकरिता ‘पर्सनॅल्टा’ होऊन जाते. जोक अपार्ट, पण तुम्हीच विचार करा, मी म्हणतो त्यात तथ्य आहे की नाही याचा. मग का नाही करायचे येत्या वर्षात असे साधे, सोपे, पण अत्यावश्यक संकल्प? त्यात मागच्या पेक्षा जास्त गुण मिळवायचा संकल्प, या वर्षात वाचनाची आवड लावण्याचा संकल्प आणि चांगलेच साहित्य वाचण्याचा निर्धार, वर्षातून एकदा तरी आपल्या आवडीप्रमाणे आणि खिशाला झेपेल असा प्रवास, जिथे एखादे ऐतिहासिक, धार्मिक किंवा महत्त्वपूर्ण ठिकाणी भेट, जिभेवर ताबा, शिस्तप्रिय आयुष्याचा संकल्प, वेळच्या वेळी कामे करण्याचा निर्धार, शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम करण्याचा संकल्प.
बॉस, या वर्षाअखेरीस संपूर्ण देश ढवळून निघाला एका घृणास्पद घटनेने. यामागची कारणे काहीही असो. पण, मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, आपली मानसिकता ही विकृत व्हायलाच नको. आपल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी या घरातच व्हाव्या आणि काही गोष्टी या बाहेरच व्हाव्या, असे अलिखित संकेत आहेत. ते जेव्हा पाळले जात नाहीत तेव्हा अशा मनोविकृत घटना घडत असतात. भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये जो प्रचंड फरक होता तो या उथळ विचारसरणीमुळे कमी होत चालला आहे.
आपल्याला आजही गरज आहे व नेहमीच राहणार ती आपल्या सांस्कृतिक वारशाचे व वैचारिक बैठकीचे जतन करण्याची. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार नाही, याचा जरी एक संकल्प करून आपण तडीस नेऊ शकलो आयुष्यात, तरी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की, ‘भारतीय’ ही विशेष ओळख आधीपण होती, तीच विशेषत: सर्व स्पर्धात्मकतेला तोंड देतसुद्धा टिकून राहू शकते.
स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, गुलाबदास महाराज, अहल्याबाई होळकर, जिजामाता, झाशीची राणी, तात्या टोपे… अशा कितीतरी असंख्य लोकांचे आशीर्वाद लाभलेले आपण असे संस्कारहीन कृत्ये करण्यास धजवतो तरी कसे?
प्लीज, या नवीन वर्षाच्या सुरुवातीसच असा काही विचार करून तुम्ही या वर्षीचे न्यू इयर रिझॉल्यूशन ठरवावे, ही मनापासून इच्छा आहे. ठरवलेले संकल्प पूर्ण करण्याचे स्वत:लाच वचन द्या, कारण कुणीच स्वत:शी खोटे बोलत नसतो.
तेव्हा बॉस लोगो, Have a great,fantastic & Creative Year Ahead….
ऍड. सचिन नारळे
९४२३१०४००३