Posted by वृत्तभारती
Friday, January 22nd, 2021
नवी दिल्ली, २२ जानेवारी – जून २०२१ पयर्र्त कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्याचा तसेच त्याआधी संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय कॉंग्रेस कार्यसमितीच्या आजच्या बैठकीत घेेण्यात आला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासह अनेक प्रस्तावही बैठकीत पारित करण्यात आले. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत आभासी पद्धतीने झालेल्या या बैठकीतील निर्णयाची माहिती कॉंग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रपरिषदेत दिली. संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया मे महिन्यापयर्र्त पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने दिला...
22 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 22nd, 2021
लखनौ, २२ जानेवारी – कार्यकर्त्यांना मान देणारा, त्यांना मोठी पदे देणारा भाजपा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे. भाजपा वगळता इतर सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही असून, तिथे देशहितापेक्षा फक्त घराणेशाहीलाच महत्त्व दिले जाते, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज शुक्रवारी येथे व्यक्त केली. भाजपात कुठलाही निर्णय कार्यकर्ता पातळीवर घेतला जातो आणि म्हणूनच देशात भाजपाचा विस्तार झाला आहे, असे त्यांनी भाजपा बूथ अध्यक्षांच्या बैठकीत सांगितले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री...
22 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 20th, 2021
मला कोणी रोखू शकत नाही, नवी दिल्ली, १९ जानेवारी – माझी प्रतिमा स्वच्छ आहे, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. ते माझ्यावर कोणतेच आरोप करू शकत नाहीत; फक्त गोळी मारू शकतात, असे उद्गार कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज काढले. राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे उपस्थित करण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसने आज ‘खेती का खून, तीन काले कानून’ या शीर्षकाखालील एक...
20 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 18th, 2021
नवी दिल्ली, १७ जानेवारी – गटबाजी, अंतर्गत राजकारण तसेच नेतृत्वाच्या संकटाचा सामना करीत असलेल्या कॉंग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच प्रयत्नांचा एक मुख्य भाग म्हणून पक्षाध्यक्षाची माळ पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याच गळ्यात घालण्याची तयारी सुरू आहे. राजस्थानमध्ये फेब्रुवारी महिन्यात कॉंग्रेसचे अधिवेशन बोलवले जाऊ शकते. हे अधिवेशन नीमराणा किंवा जैसलमेरमध्ये होण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात राहुल गांधी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष होतील, असे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी १६...
18 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 29th, 2020
नवी दिल्ली, २९ डिसेंबर – जो नेता पार्टटाईम राजकारण आणि फुलटाईम पर्यटन करेल, अशा नेत्याला त्याची ‘नानी’ आठवणे स्वाभाविकच आहे, अशी बोचरी टीका भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज मंगळवारी केली. राजकारणात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी राजकारणच प्राधान्याचे असायला हवे. जनसेवेचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, एका मोठ्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष राहिलेली व्यक्ती जेव्हा सततच्या पराभवांनी खचून जाते, निराश होते, तेव्हा ती व्यक्ती राजकारणासाठी कमी आणि...
29 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 28th, 2020
नवी दिल्ली, २८ डिसेंबर – कॉंगे्रस पक्षाचा आज सोमवारी १३६ वा स्थापना दिन असताना, पक्षाचे खासदार राहुल गांधी मात्र इटलीला गेले. सोनिया गांधी यांनी देखील गर्दी होण्याचे कारण देत, स्थापना दिन कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवले. त्यामुळे गांधी घराण्यातील सदस्यांशिवाय नेत्यांना पक्षाचा स्थापना दिन कार्यक्रम साजरा करावा लागला. कॉंग्रेसच्या स्थापनादिनी राहुल गांधी इटलीला गेल्याने त्यांच्या या दौर्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांची भारतातील सुटी संपली आहे. आता ते इटलीला...
28 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 27th, 2020
नवी दिल्ली, २७ डिसेंबर – कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाची एक चित्रफीत समोर आणत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज रविवारी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या भाषणात राहुल गांधी शेतकर्यांना त्यांचा माल मंडीच्या बाहेर विकता यावा, यासाठी विशेष फूड पार्कची मागणी करतात आणि आता तेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करतात. ही काय जादू आहे, असा चिमटाही नड्डा यांनी काढला. आता ढोंगीपणा चालणार नाही. जनतेला तुमचे खरे...
27 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 25th, 2020
नवी दिल्ली, २४ डिसेंबर – केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आज कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस नेते राष्ट्रपती भवनाकडे जात असताना त्यांना पोलिसांनी मध्येच अडवले. याच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयापुढेच निदर्शने केली. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि पक्षाच्या खासदारांना पोलिसांचे आदेश धुडकावून बैठा सत्याग्रह केल्याबद्दल स्थानबद्ध करण्यात आले. कॉंग्रेसने आज पक्षाच्या अकबर मार्गावरील कार्यालयापासून राष्ट्रपती...
25 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 23rd, 2020
भाजपाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते: रविशंकर प्रसाद यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, २३ डिसेंबर – देशात कोणत्याही राजकीय पक्षात भाजपाविरुद्ध स्वबळावर लढा देण्याची ताकद नाही, हेच आजवरच्या आणि आता जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषदेच्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे. सर्व पक्ष एकत्र येऊनही भाजपाला सर्वांत मोठा राजकीय पक्ष होण्यापासून रोखता आले नाही. मतदारांनी त्यांना दिलेली ही मोठी चपराकच आहे, असा जोरदार हल्ला भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद...
23 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 19th, 2020
पाटणा, १९ डिसेंबर – कॉंग्रेसचा राजकीय उत्तराधिकारी निवडताना पुत्रमोहाचा त्याग करा, असा सल्ला बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला. राहुल गांधी यांच्यात नागरिकांना उत्साहित करण्याची, त्यांना कॉंगे्रसकडे आकर्षित करण्याची क्षमता नाही, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. जनतेची गोष्ट तर सोडूनच द्या, पण त्यांच्याच पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही; आणि याच एकमेव कारणामुळे लोक कॉंग्रेसपासून दूर जात आहेत,...
19 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 19th, 2020
दिला लेखी माफीनामा, नवी दिल्ली, १९ डिसेंबर – मानहानीच्या खटल्यात कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र विवेक डोवाल यांची माफी मागण्याची नाचक्की ओढवली. रमेश यांनी त्यांना लेखी माफीनामाच सादर केला. आपल्या माफीनाम्यात रमेश यांनी म्हटले आहे की, ‘विवेक आणि त्यांचे वडील अजित डोवाल यांच्याबाबत मी जे काही बोललो होतो, त्यावेळचा तो क्षण मला उत्तेजित करून गेला होता. तो काळ निवडणुकीचा होता. डोवाल यांच्या...
19 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 12th, 2020
प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गौप्यस्फोट, नवी दिल्ली, १२ डिसेंबर – २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसच्या झालेल्या दारुण पराभवासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हेच जबाबदार होते, असा गौप्यस्फोट दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात प्रणव मुखर्जी यांचं निधन झाले आहे. ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ या आपल्या पुस्तकातून मुखर्जी यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. माझी राष्ट्रपतिपदी नियुक्ती झाल्यानंतर कॉंग्रेसने राजकीय दिशा गमावली. सोनिया...
12 Dec 2020 / No Comment / Read More »