किमान तापमान : 27.92° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.99°से. - 29.04°से.
गुरुवार, 05 डिसेंबर घनघोर बादल27.27°से. - 28.62°से.
शुक्रवार, 06 डिसेंबर टूटे हुए बादल26.15°से. - 27.83°से.
शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल24.97°से. - 25.95°से.
रविवार, 08 डिसेंबर घनघोर बादल22.95°से. - 26.45°से.
सोमवार, 09 डिसेंबर घनघोर बादल23.1°से. - 27.21°से.
मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, २७ डिसेंबर – कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणाची एक चित्रफीत समोर आणत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज रविवारी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या भाषणात राहुल गांधी शेतकर्यांना त्यांचा माल मंडीच्या बाहेर विकता यावा, यासाठी विशेष फूड पार्कची मागणी करतात आणि आता तेच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करतात. ही काय जादू आहे, असा चिमटाही नड्डा यांनी काढला. आता ढोंगीपणा चालणार नाही. जनतेला तुमचे खरे रूप कळले आहे, असा हल्लाही त्यांनी चढविला.
या चित्रफितीत राहुल गांधी सांगतात की, मी एकदा उत्तर प्रदेशच्या दौर्यावर असताना एक शेतकरी भेटला. तो शेतकरी मला म्हणाला की, हा काय चमत्कार आहे? आम्हाला एक किलो आलूसाठी फक्त दोन रुपये भाव मिळतो आणि माझी मुले आलूपासूनच तयार केलेल्या चिप्ससाठी दहा रुपये मोजतात. मी त्याला विचारले, यासाठी सरकारने काय करायला हवे? यावर तो म्हणाला की, आम्हाला आमचा माल थेट उद्योगांना विकता यावा, यासाठी नवी व्यवस्था असायला हवी; जेणेकरून बाजारांमधील दलालांपासून आम्हाला मुक्ती मिळेल आणि आमच्या मालालाही योग्य भाव मिळेल. यानंतर राहुल गांधी आपल्या भाषणात पुढे म्हणतात की, शेतकर्यांना त्यांचा माल थेट विकता यावा, आपल्या इच्छेनुसार भाव प्राप्त करता यावा, यासाठी सरकारने फूड पार्कसाठी विशेष व्यवस्था करायला हवी.
याच चित्रफितीचा संदर्भ देत नड्डा यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढविला. ज्या विशेष व्यवस्थेची तुम्ही आपल्या भाषणात वकालत केली, त्याच व्यवस्थेला आता तुम्ही विरोध करीत आहात. वस्तुस्थिती अशी आहे की, तुम्हाला देशहित, शेतकर्यांचे हित याच्याशी काहीच संबंध नाही. तुम्हाला फक्त प्रत्येक मुद्यावर राजकारण करायचे असते आणि तेच तुम्ही करीत आहात. तुमचे दुर्दैव इतकेच की, देशातील लोकांना तुमचा खरा चेहरा समजला असल्याने, तुमचे हे घाणेरडे राजकारण आता यशस्वी होत नाही, अशी बोचरी टीका नड्डा यांनी टि्वटरवर केली.