किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.92° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.04°से.
गुरुवार, 05 डिसेंबर घनघोर बादल27.27°से. - 28.62°से.
शुक्रवार, 06 डिसेंबर टूटे हुए बादल26.15°से. - 27.83°से.
शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल24.97°से. - 25.95°से.
रविवार, 08 डिसेंबर घनघोर बादल22.95°से. - 26.45°से.
सोमवार, 09 डिसेंबर घनघोर बादल23.1°से. - 27.21°से.
मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादलग्राहकांच्या हितरक्षणाचा हेतू,
नवी दिल्ली, २७ डिसेंबर – देशासह विदेशातील दालनांमधून विकल्या जाणार्या सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क प्रमाणन मिळविण्यासाठी वार्षिक २० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा सराफा क्षेत्रातील मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वतीने करण्यात आली आहे.
मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी सांगितले की, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स मागील दोन दशकांहून अधिक काळ १०० टक्के बीआयएस हॉलमार्क केलेले दागिने विकत आहे. गुणवत्तेच्या आश्वासनामुळे मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या ब्रँडची विश्वासार्हता आणि विश्वास बळकट झाला आहे. सरकारने जून २०२१ पासून
हॉलमार्किंग अनिवार्य करणे स्वागतार्ह पाऊल असून, दागिन्यांच्या किरकोळ विक्री तसेच ग्राहकांना फायदाच होईल. विक्रेत्यांच्या एका विभागाकडून अद्यापही अप्रमाणित शुद्धतेचे सोन्याचे दागिने देशभरातील अनेक ग्राहकांना विकले जात आहेत. मात्र, सक्तीच्या बीआयएस हॉलमार्किंगमुळे उद्योगातील गैरप्रकारांना आळा बसेल. तसेच, एकूण व्यापार आणि व्यापारातील ग्राहकांच्या आत्मविश्वासाला चालना मिळू शकेल.
हॉलमार्क केलेले दागिने खरेदी करण्याच्या फायद्यांबाबत ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी या व्यवसायातील सर्वांनी पुढे यावे. सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ व्यापारात असणार्या मंडळींनी हॉलमार्क केलेले दागिने विकण्याचा आग्रह धरला पाहिजे, असेही अहमद यांनी स्पष्ट केले.