किमान तापमान : 27.92° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 3.08 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.85°से. - 29.04°से.
गुरुवार, 05 डिसेंबर घनघोर बादल27.27°से. - 28.62°से.
शुक्रवार, 06 डिसेंबर टूटे हुए बादल26.15°से. - 27.83°से.
शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल24.97°से. - 25.95°से.
रविवार, 08 डिसेंबर घनघोर बादल22.95°से. - 26.45°से.
सोमवार, 09 डिसेंबर घनघोर बादल23.1°से. - 27.21°से.
मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादलपंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ, सर्व नागरिकांना मिळणार आरोग्य विमा कवच,
नवी दिल्ली, २६ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी अशा आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ केला. येथील सर्व नागरिकांना या योजनेंतर्गत आरोग्य विमा कवच उपलब्ध केले जाणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली.
आज जम्मू-काश्मीरसाठी ऐतिहासिक दिवस आहे. केंद्राच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपासून येथील नागरिक नेहमीच वंचित राहिले आहेत. आज त्यांच्यासाठी आयुषमान भारत योजना लागू करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आभासी माध्यमातून ही योजना लागू करताना सांगितले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे देखील आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. मनोज सिन्हा यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांना आरोग्य कार्डचे वाटप केले.
या योजनेंतर्गत सर्व नागरिकांना मोफत आरोग्य विमा दिला जाणार असून, विम्याची रक्कम प्रती कुटुंब पाच लाख रुपये इतकी असेल, असे मोदी म्हणाले.
नागरिकांच्या नजरेत भविष्याचा विश्वास दिसतो
जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरने नवा अध्याय लिहिला आहे. येथील प्रत्येक मतदाराच्या चेहर्यावर मला विकासाची आशा दिसली. या निवडणुकीत नागरिकांनी लोकशाहीची मुळे आणखी मजबूत करण्याचे काम केले. मतदारांच्या नजरेत भूतकाळ मागे पडलेला दिसतो. उज्ज्वल भविष्याचा विश्वास त्यांच्या नजरेत दिसून येतो, असे मोदी यांनी सांगितले.
१० लाखांवर शौचालये बांधली
कोरोना संक्रमणकाळात जम्मू-काश्मीरमध्ये १८ लाख गॅस सिलेंडर्स रिफील करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत १० लाखांहून अधिक शौचालये बांधण्यात आली. यामागील हेतू केवळ शौचालय बांधण्यापुरता मर्यादित नाही तर नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा देखील आहे, असे त्यांनी नमूद केले.
काश्मिरातील निवडणूक लोकशाहीचे उत्तम उदाहरण
दिल्लीत आपापल्या वातानुकूलित घरांत बसून काही लोक मला नेहमी टोमणे मारतात, अपमान करीत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. या लोकांना मला इतकेच सांगायचे आहे की, जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. काही राजकीय लोक सतत लोकशाहीवर व्याख्यान देत असतात. त्यांचा खोटारडेपणा इथेच दिसतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही पुडुचेरीत स्थानिक निवडणूक झाली नाही. दुसरीकडे जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एक वर्षाच्या आत पंचायत स्तरीय निवडणुका झाल्या, असा चिमटा मोदी यांनी काढला.