किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
नवी दिल्ली, २६ डिसेंबर – ऑक्सफर्डने विकसित केलेल्या कोरोना लसीला पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार असून, जानेवारीपासून ही लस आपत्कालीन उपयोगासाठी सज्ज होणार आहे.
सध्या ही लस ब्रिटनच्या औषध नियंत्रक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. ब्रिटनची ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने संयुक्तपणे ही विकसित केली आहे. ब्रिटनच्या मंजुरीनंतर लगेच भारतातही या लसीवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या ऑक्सफर्ड कंपनीची तज्ज्ञ समिती या लसीच्या सुरक्षेचा आणि प्रतिकारशक्तीचा अभ्यास करीत असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या लसीच्या काही चाचण्याही घेण्यात आल्या असून, त्यांचे परिणामही सकारात्मक आले. त्यामुळे आपत्कालीन उपयोगासाठी या लसीला लवकरच मंजुरी मिळू शकते, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.
भारत बायोटेकच्या लसीला विलंब
भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची तिसर्या टप्प्यातील चाचणी अजूनही सुरू असल्याने, या लसीला मंजुरी देण्यासाठी आणखी काही दिवस विलंब होणार आहे. तिथेच फायझरच्या लसीने अद्याप आपले सादरीकरण भारतात केले नसल्याने, या लसीवर विचार सुरू नसल्याचे सूत्रांनी सांगितले.