किमान तापमान : 23.29° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 33 %
वायू वेग : 4.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.43°से. - 26.85°से.
मंगळवार, 10 डिसेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.57°से.
बुधवार, 11 डिसेंबर कुछ बादल24.59°से. - 27.11°से.
गुरुवार, 12 डिसेंबर छितरे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 13 डिसेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 28.8°से.
शनिवार, 14 डिसेंबर छितरे हुए बादल24.69°से. - 28.58°से.
रविवार, 15 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, २७ डिसेंबर – देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच, २०२० या मावळत्या वर्षाने आपल्याला खूप काही दाखविले आणि शिकविले. नवीन वर्षात भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात आणखी मजबूत राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले.
आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या अंजली आणि मुंबईच्या अभिषेक यांनी पाठविलेला संदेश वाचून दाखवत त्यांचे कौतुक केले.
माझ्यासमोर तुमची असंख्य पत्रे आहेत. आपण पाठविलेल्या सूचनाही आहेत. अंजली यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊ या, त्याचे अभिनंदन करू या, असे मोदी म्हणाले. मुंबईच्या अभिषेक यांनी नमोऍपवर एक संदेश पाठविला. त्यांनी लिहिले आहे की, २०२० ने आम्हाला जे काही दाखविले, जे शिकविले त्याचा कधी विचार केला नव्हता, असे ते म्हणाले.
जागतिक दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करा
देशातील नागरिकांचा आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा सातत्याने वाढत आहे. देशवासीयांना जागतिक दर्जाच्या स्वदेशी वस्तू हव्या आहेत. पत्र पाठविणार्या अनेकांनी मला याबाबत काही सूचना केलेल्या आहेत. माझे उद्योगांना नम्र आवाहन आहे की, त्यांनी देशातच जागतिक दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करावे, असे मोदी यांनी सांगितले.
देशातील बिबट्यांची संख्या वाढली
आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. २०१४-१८ या काळात भारतातील बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये देशात बिबट्यांची संख्या ७,९०० होती. २०१९ मध्ये ही संख्या वाढून १२,८५२ झाली आहे.
देशातील बर्याच राज्यांत विशेषत: मध्य भारतात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. ही एक मोठी कामगिरी आहे, असे मोदी म्हणाले.
देशाच्या एकजुटीचे मोठे कौतुक झाले
मला अनेकांनी पत्र पाठविली आहेत. यात देशाचे सामर्थ्य आणि एकजुटीचे कौतुक केले आहे. जनता संचारबंदीसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशवासीयांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला; एकजूट दाखवली, हेसुद्धा अनेकांनी लक्षात ठेवले, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
नवीन वर्षात करा असा संकल्प
प्रत्येक जण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी एक संकल्प अवश्य करा. मी आधीही बोललो आहे. पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी तयार करा. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो, त्यात नकळत विदेशात तयार होणार्या वस्तू तर नाही ना, यासाठी त्या वस्तूंची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूंची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मोदी यांनी केले.