|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

शेतकरी आंदोलन माओवाद्यांच्या हातात; गोयल यांचा आरोप

शेतकरी आंदोलन माओवाद्यांच्या हातात; गोयल यांचा आरोपकृषी कायदे फायद्याचे असल्याचा दावा, नवी दिल्ली, १२ डिसेंबर – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेले असून डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रेल्वेमंत्री तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. ते एका हिंदी वृत्तपत्राशी बोलत होते. शेतकर्‍यांना माओवादी आणि डाव्यांकडून भडकावण्यात येत आहे, तर सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार आहे. प्रस्तावित कायद्यामुळे फायदाच...12 Dec 2020 / No Comment / Read More »

शेतकरी आंदोलन बळकावण्याचा तुकडेतुकडे गँगचा प्रयत्न

शेतकरी आंदोलन बळकावण्याचा तुकडेतुकडे गँगचा प्रयत्नरविशंकर प्रसाद यांचा गंभीर आरोप, नवी दिल्ली, ११ डिसेंबर – तुकडेतुकडे गँग शेतकरी आंदोलन बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज शुक्रवारी केला. तुकडेतुकडे गँग देशातील शेतकरी आंदोलन आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भक्कम पुरावे सरकारजवळ आहेत. हा सारा प्रकार अतिशय धोकादायक आहे. ज्या तथाकथित बुद्धिजीवींच्या सुटकेची मागणी शेतकरी आंदोलनाच्या आडून केली जात आहे, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत....11 Dec 2020 / No Comment / Read More »

देशभर ७०० चौपालचे आयोजन

देशभर ७०० चौपालचे आयोजनभाजपा सांगणार कृषी कायद्यांचे फायदे, नवी दिल्ली, ११ डिसेंबर – कृषी कायद्यांचे फायदे देशवासीयांसमोर मांडण्यासाठी येत्या काळात देशातील ७०० जिल्ह्यांमध्ये पत्रपरिषदा तसेच चौपालचे आयोजन करण्याचा मोठा निर्णय भाजपाने आज शुक्रवारी घेतला आहे. नव्या कृषी कायद्यावर सरकारने दिलेला प्रस्ताव आंदोलक शेतकर्‍यांनी फेटाळून लावल्याचे आम्हाला माध्यमांमधूनच समजले. नव्या कृषी कायद्यांवर शेतकरी संघटनांच्या आक्षेपावर तोडगा काढण्याचा मार्ग या प्रस्तावातून आम्ही मांडला होता. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेला पुढे आले पाहिजे. सरकार...11 Dec 2020 / No Comment / Read More »

संपुआचे अध्यक्षपद पवारांकडे जाण्याची शक्यता!

संपुआचे अध्यक्षपद पवारांकडे जाण्याची शक्यता!नवी दिल्ली, १० डिसेंबर – कॉंगे्रसप्रणीत संपुआचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे. आजारी असलेल्या सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे मत आहे. शरद पवार यांनी संपुआचे अध्यक्षपद स्वीकारून, आपला राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष मूळ कॉंगे्रसमध्ये विलीन करावा आणि कॉंगे्रसची सूत्रेही आपल्या हातात घ्यावी, असा प्रस्ताव त्यांना सादर करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोनिया गांधी यांना विविध आजारांनी ग्रासले असून,...11 Dec 2020 / No Comment / Read More »

खाजगी कंपन्यांना कृषी क्षेत्रात प्रवेशासाठी शरद पवारच होते अनुकूल

खाजगी कंपन्यांना कृषी क्षेत्रात प्रवेशासाठी शरद पवारच होते अनुकूलनवी दिल्ली, ७ डिसेंबर – नोव्हेंबर २०११ मध्ये तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनीच, राज्यांना पत्र लिहून खाजगी कृषी समित्यांना देशाच्या कृषी क्षेत्रात प्रवेश देण्याची विनंती केली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही त्यांनी या आशयाचे पत्र लिहिले होते, असा स्पष्ट आरोप भाजपाचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी पुराव्यांसह केला आहे. यामुळे शेतकरी संघटना आणि शरद पवार या दोघांचेही पितळ उघडे पडले आहे. विपणन व्यवस्थेत खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विद्यमान...7 Dec 2020 / No Comment / Read More »

काँग्रेसचा दुटप्पी चेहरा उघडकीस : रविशंकर प्रसाद

काँग्रेसचा दुटप्पी चेहरा उघडकीस : रविशंकर प्रसादराजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा आंदोलनात सहभाग, नवी दिल्ली, ७ डिसेंबर – शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या आणि भारत बंदला पाठिंबा देणार्‍या कॉंगे्रस व अन्य विरोधी पक्षांची दुटप्पी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली आहे. हे विरोधी पक्ष आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. केवळ मोदी सरकारला विरोध, एवढेच त्यांचे काम आता उरले आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी...7 Dec 2020 / No Comment / Read More »

गांधी कुटुंब ‘पार्टटाईम’ राजकारणी

गांधी कुटुंब ‘पार्टटाईम’ राजकारणीजयपूर, ७ डिसेंबर – राहुल गांधी आणि त्यांचे घराणे हे पार्टटाईम राजकारण करीत असतात. त्यांचे राजकारण सवडीनुसार असते. कॉंगे्रस पक्षाने शेतकरी आंदोलन आणि भारत बंदचे समर्थन केले, पण प्रत्यक्षात गांधी घराण्याला शेतकर्‍यांशी काहीच घेणेदेणे नाही. आज शेतकर्‍यांची जी अवस्था आहे, त्यासाठी एकमेव कॉंगे्रसच जबाबदार आहे, असा आरोप राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी आज सोमवारी केला. कॉंगे्रसने शेतकर्‍यांच्या भारत बंदचे समर्थन केले आहे. मात्र, सध्या भारत बंदची नाही, तर भारत...7 Dec 2020 / No Comment / Read More »

शेतकर्‍यांसाठी ५० वर्षांत काय केले?

शेतकर्‍यांसाठी ५० वर्षांत काय केले?भाजपाचा कॉंगे्रसवर जोरदार हल्ला, नवी दिल्ली, ५ डिसेंबर – केंद्रातील मोदी सरकार शेतकर्‍यांच्या हितात निर्णय घेत असताना, त्यांच्या मनात कॉंगे्रस पक्ष विष कालवण्याचा, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. कॉंगे्रसने देशावर ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शासन केले. या काळात तुमच्या सरकारने शेतकर्‍यांसाठी काय केले, अशा शब्दांत भाजपाने आज शनिवारी हल्ला चढविला. शेतकर्‍यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून, त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकार आवश्यक ती सर्वच पावले उचलत आहे आणि...5 Dec 2020 / No Comment / Read More »

बिहारमध्ये कॉंग्रेसचीच खराब कामगिरी कारणीभूत

बिहारमध्ये कॉंग्रेसचीच खराब कामगिरी कारणीभूततारिक अन्वर यांचा घरचा अहेर, नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रसने ७० जागा मागितल्या होत्या, त्यातील किमान ४० जागा जिंकणे अपेक्षित होते, पण फक्त १९ जागाच जिंकता आल्या. या निवडणूक निकालातून कॉंग्रेसने धडा घेण्याची, तसेच आपण कुठे चुकलो, मागे पडलो, यावर आत्मचिंतनही करण्याची गरज आहे, अशा शब्दांत पक्षाचे वरिष्ठ नेते तारिक अन्वर यांनी आज पक्षाला घरचा अहेर दिला. निवडणुकीसाठी जागांचे वाटत निश्‍चित करण्यात नको तितका विलंब झाला....15 Nov 2020 / No Comment / Read More »

राहुल गांधी चीन, पाकिस्तानची भाषा बोलताहेत : अमित शाह

राहुल गांधी चीन, पाकिस्तानची भाषा बोलताहेत : अमित शाहनवी दिल्ली, २८ जून – सीमेवर आपले जवान लढत असतांना राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला. चीनसीमेवरील तणावाबाबत राहुल गांधी कधीही संसदेत चर्चा करू शकत होते, मात्र सीमेवर आपले जवान प्राण धोक्यात टाकून लढत असतांना चीन आणि पाकिस्तानला आनंद होईल, असे बोलणे त्यांनी टाळायला हवे होते, असे शाह म्हणाले. आता संसदेचे अधिवेशन होणार आहे, तुम्हाला संसदेत चर्चा करायची आहे,...29 Jun 2020 / No Comment / Read More »

राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून पैसे घेतले

राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून पैसे घेतले– चिदम्बरम् यांची कबुली! कॉंग्रेस पुन्हा तोंडघशी, नवी दिल्ली, २७ जून – राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून घेतलेली देणगी परत केली, तर चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी संपून जाईल व परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल का, असा अजब प्रश्न कॉंग्रेससचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी आज उपस्थित करीत, फाऊंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याची कबुलीच देऊन टाकली. राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून मोठी देणगी घेतल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी...28 Jun 2020 / No Comment / Read More »

स्वार्थासाठी देशाशी कितीवेळा विश्वासघात केला : नड्डा

स्वार्थासाठी देशाशी कितीवेळा विश्वासघात केला : नड्डा– भाजपाध्यक्षांचा सोनिया गांधींना थेट सवाल, नवी दिल्ली, २७ जून – चीन आणि कॉंग्रेस यांच्यातील संशयास्पद संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी का दिली, असा प्रश्न आज पुन्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी उपस्थित केला. आपल्या स्वार्थासाठी देशाशी किती वेळा विश्वासघात केला, हे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वा आयोजित पत्रपरिषदेत गांधी घराण्यावर आज लागोपाठ तिसर्‌या दिवशी हल्ला चढवताना नड्डा म्हणाले...28 Jun 2020 / No Comment / Read More »