किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलतारिक अन्वर यांचा घरचा अहेर,
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रसने ७० जागा मागितल्या होत्या, त्यातील किमान ४० जागा जिंकणे अपेक्षित होते, पण फक्त १९ जागाच जिंकता आल्या. या निवडणूक निकालातून कॉंग्रेसने धडा घेण्याची, तसेच आपण कुठे चुकलो, मागे पडलो, यावर आत्मचिंतनही करण्याची गरज आहे, अशा शब्दांत पक्षाचे वरिष्ठ नेते तारिक अन्वर यांनी आज पक्षाला घरचा अहेर दिला.
निवडणुकीसाठी जागांचे वाटत निश्चित करण्यात नको तितका विलंब झाला. याचा परिणामही महाआघाडीवर पडला. पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने, मित्रपक्षांचा आधीच शोध घेणे आणि जागावाटप ठरविणे, यासारखे निर्णय तातडीने घेतले, तरच काही सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे अन्वर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
कॉंग्रेसच्या कामगिरीतही बर्याच उणिवा राहिल्या, यामुळे महाआघाडीतील इतर घटक पक्षांच्या तुलनेत कॉंगे्रस मागे राहिली. ७० जागा लढण्यासाठी मिळाल्यानंतर पक्षाने फार चांगली कामगिरी करायला हवी होती. बिहारमधील जनतेला नवा पर्याय देण्याची अतिशय चांगली संधी होती. लोक त्यासाठी तयारही होते, पण संपूर्ण महाआघाडीलाच यात अपयश आले, असे ते म्हणाले.
कॉंगे्रसने ३५ ते ४० जागा जिंकल्या असत्या, तर आज राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले असते. त्यामुळे असे न होण्याकरिता मी कॉंगे्रसलाच जबाबदार धरेन. आता तरी पक्षाच्या नेतृत्वाने आत्मचिंतन करावे आणि आतापर्यंत झालेल्या चुका दुरुस्त करून, कॉंगे्रसला मजबूत करण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.