किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलरविशंकर प्रसाद यांचा गंभीर आरोप,
नवी दिल्ली, ११ डिसेंबर – तुकडेतुकडे गँग शेतकरी आंदोलन बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज शुक्रवारी केला.
तुकडेतुकडे गँग देशातील शेतकरी आंदोलन आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भक्कम पुरावे सरकारजवळ आहेत. हा सारा प्रकार अतिशय धोकादायक आहे. ज्या तथाकथित बुद्धिजीवींच्या सुटकेची मागणी शेतकरी आंदोलनाच्या आडून केली जात आहे, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यामुळे न्यायालयानेही त्यांना जामीन देण्याचे नाकारले आहे. मात्र, शेतकर्यांच्या आंदोलनात अशा लोकांची छायाचित्रे दाखविण्यात येत आहे. तुकडेतुकडे गँग शेतकर्यांच्या या आंदोलनात सहभागी झाल्यामुळेच शेतकरी नेत्यांनी सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरत आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.
आपले आंदोलन अशा देशद्रोही शक्तींच्या हातात जाणार नाही, याची काळजी शेतकरी नेत्यांनी घेतली पाहिजे. आपल्या आंदोलनाचे पावित्र्य कायम ठेवले पाहिजे. देशाची सार्वभौमता धोक्यात आणणार्या या लोकांविरुद्ध सरकार कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
ममता बॅनर्जी इतक्या हताश आणि निराश झाल्या की, झेड प्लस सुरक्षा असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्या स्थानिक सुरक्षा देऊ शकल्या नाहीत, असा आरोप करीत प्रसाद म्हणाले की, सत्तेवर येण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी डाव्यांच्या हिंसाचाराचा सामना केला, पण आता त्याच हिंसाचाराला प्रोत्साहन देत असतील तर त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. मी कायदा मंत्री असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. मात्र, पश्चिम बंगाल सरकार पूर्णपणे पक्षपाती आहे, यात शंका नाही. त्यामुळेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीलाही सुरक्षा नाकारली जाते. भारतीय राजकारण याआधी एवढे खाली कधी गेले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बंगालमध्ये लोब्कशाहीची हत्या : जावडेकर
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत, पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
नड्डा यांच्या वाहनताफ्यावरील हल्ल्यासाठी राज्यातील तृणमूल कॉंग्रेसचे सरकार जबाबदार आहे. तृणमूल कॉंग्रेसचे नेते असे हल्ले घडवून आणत आहेत. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षावर हल्ला होतो. मात्र, याबाबत कॉंग्रेस, डावे तसेच अन्य पक्षांचे नेते चुप्पी साधतात, हे दुर्दैवी आहे, असे जावडेकर म्हणाले. देशातील शेतकरी आंदोलन देश तोडणार्या शक्तींच्या हातात गेल्याचा आरोपही जावडेकर यांनी केला.