किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभाजपा सांगणार कृषी कायद्यांचे फायदे,
नवी दिल्ली, ११ डिसेंबर – कृषी कायद्यांचे फायदे देशवासीयांसमोर मांडण्यासाठी येत्या काळात देशातील ७०० जिल्ह्यांमध्ये पत्रपरिषदा तसेच चौपालचे आयोजन करण्याचा मोठा निर्णय भाजपाने आज शुक्रवारी घेतला आहे.
नव्या कृषी कायद्यावर सरकारने दिलेला प्रस्ताव आंदोलक शेतकर्यांनी फेटाळून लावल्याचे आम्हाला माध्यमांमधूनच समजले. नव्या कृषी कायद्यांवर शेतकरी संघटनांच्या आक्षेपावर तोडगा काढण्याचा मार्ग या प्रस्तावातून आम्ही मांडला होता. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेला पुढे आले पाहिजे. सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
शेतकर्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी शेतकर्यालाही सुखासमाधानाचे जीवन जगता यावे तसेच शेतीही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावी म्हणून सरकारने कृषी कायदे केले आहेत. सरकारने शेतकर्यांच्या सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी २० पानांचा प्रस्ताव दिला आहे, हा प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे आहे. त्यांनी तो वाचला तर आपल्या मागण्यांची पूर्तता या प्रस्तावाच्या माध्यमातून होऊ शकते, याची त्यांची खात्री पटेल. प्रस्तावातील कोणत्याही मुद्यावर शेतकरी संघटनांना हरकत असेल तर त्यांनी चर्चेसाठी समोर यावे. सरकार चर्चा करायला तयार आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी आपली भूमिका सरकारजवळ स्पष्ट केली नाही. शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळल्याचे आम्हाला माध्यमांतूनच समजले, असे ते म्हणालेे.
शेतकर्यांच्या आंदोलनामुळे जनतेचीच नाही तर शेतकर्यांचीही गैरसोय होते आहे. त्यामुळे देशातील जनता तसेच शेतकर्यांच्या व्यापक हितासाठी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन तोमर यांनी केले.
किमान हमी भाव, कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच अन्य मुद्दे हे शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहेत, पण शरजील इमाम तसेच अन्य वादग्रस्त नेत्यांच्या सुटकेची मागणी हा शेतकरी आंदोलनाचा मुद्दा कसा होऊ शकतो, असा हरकतीचा मुद्दा तोमर यांनी उपस्थित केला.
नव्या कृषी कायद्याचे फायदे शेतकर्यांपर्यंत तसेच देशातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. येत्या काही दिवसांत देशातील ७०० जिल्हास्थानी पत्रपरिषदा तसेच चौपालचे आयोजन करून कृषी कायद्याचे फायदे भाजपा देशासमोर मांडणार आहे.