किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १० डिसेंबर – कॉंगे्रसप्रणीत संपुआचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे. आजारी असलेल्या सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे मत आहे.
शरद पवार यांनी संपुआचे अध्यक्षपद स्वीकारून, आपला राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष मूळ कॉंगे्रसमध्ये विलीन करावा आणि कॉंगे्रसची सूत्रेही आपल्या हातात घ्यावी, असा प्रस्ताव त्यांना सादर करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोनिया गांधी यांना विविध आजारांनी ग्रासले असून, त्यांना वारंवार उपचारासाठी विदेशात जावे लागते. त्यामुळे त्या राजकारणातूनच निवृत्त होण्याचा विचार करीत आहेत. अशा स्थितीत कॉंग्रेस आणि संपुआचे नेतृत्व कुणाकडे द्यावे, यावर मागील अनेक दिवसांपासून उच्च पातळींवर चर्चा सुरू आहे. संपुआ आणि कॉंगे्रसचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे सोपविले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पदासाठी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे नावही पुढे करण्यात आले होते. मात्र, ही जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, स्वत: सोनिया गांधी यांनीच शरद पवारांना याबाबत विनंती केली असून, पवारदेखील आता यावर गंभीरपणे विचार करीत आहेत. इतकेच नाही, तर पवार यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याचीदेखील चर्चा आहे.
२०१९ मधील निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते, पण त्या निवडणुकीत कॉंग्रेससह संपुआचाही दारुण पराभव झाला होता. यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.