किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, २८ जून – सीमेवर आपले जवान लढत असतांना राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला.
चीनसीमेवरील तणावाबाबत राहुल गांधी कधीही संसदेत चर्चा करू शकत होते, मात्र सीमेवर आपले जवान प्राण धोक्यात टाकून लढत असतांना चीन आणि पाकिस्तानला आनंद होईल, असे बोलणे त्यांनी टाळायला हवे होते, असे शाह म्हणाले. आता संसदेचे अधिवेशन होणार आहे, तुम्हाला संसदेत चर्चा करायची आहे, तर करा, आम्ही चर्चेला घाबरत नाही, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, १९६२ पासूनच्या स्थितीवर दोन-दोन हात होऊनच जाऊ द्या!
सीमेवर उद्भवलेल्या तणावाच्या परिस्थितीचा सामना करण्यास सरकार सक्षम आहे. अशा वेळी एका राष्ट्रीय पक्षाचा माजी अध्यक्ष या मुद्यावर खालच्या दर्जाचे राजकारण करतो, याचे आश्चर्य वाटते, असे नमूद करत शाह म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा वापर चीन आणि पाकिस्तानातील लोक हॅशटॅग म्हणून करत आहे. आपल्या नेत्याच्या हॅशटॅगमुळे चीन आणि पाकिस्तानची ताकद वाढत आहे, याचा कॉंग्रेनेच विचार केला पाहिजे. मी त्यांना काही सल्ला देणार नाही. राहुल गांधी आणि कॉंग्रेसनेच याबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख सरेंडर मोदी असा केला होता. त्याचा अमित शाह यांनी आज समाचार घेतला.
लडाखमधील परिस्थितीवर बोलण्याची ही वेळ नाही, असे ते म्हणाले.
भाजपात पक्षातर्ंगत लोकशाही नाही, या कॉंग्रेसच्या आरोपांचा समाचार घेतांना शाह म्हणाले की, इंदिरा गांधींनंतर कॉंग्रेसमध्ये आजपर्यंत एक-दोन अपवाद सोडले तर गांधी घराण्याच्या बाहेरचा एकही अध्यक्ष झाला नाही. उलट भाजपात लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह, नितीन गडकरी, राजनाथसिंह, मी आणि जे. पी. नड्डा अध्यक्ष झालेत. आम्ही सर्व एकाच कुटुंबातील आहे का?