किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– चिदम्बरम् यांची कबुली! कॉंग्रेस पुन्हा तोंडघशी,
नवी दिल्ली, २७ जून – राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून घेतलेली देणगी परत केली, तर चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी संपून जाईल व परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल का, असा अजब प्रश्न कॉंग्रेससचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी आज उपस्थित करीत, फाऊंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याची कबुलीच देऊन टाकली.
राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून मोठी देणगी घेतल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी केला होता. या मुद्यावरून नड्डा दोन दिवसांपासून कॉंग्रेसवर विशेषत: गांधी घराण्यावर हल्ला चढवत आहे. यावर नड्डा यांना प्रत्युत्तर देण्याच्या नादात चिदम्बरम् यांनी देणगी घेतल्याची अप्रत्यक्ष कबुली देत आपल्याच पक्षाला तोंडघशी पाडले आहे. नड्डा यांच्यावर हल्ला चढवताना केलेल्या टि्वटमध्ये चिदंबरम् यांनी म्हटले की, भाजपा अध्यक्ष नड्डा अर्धसत्य सांगण्यात पटाईत आहे. माझे सहकारी रणदीप सुर्जेवाला यांनी शुक‘वारीच त्यांचे पितळ उघडे पाडले होते.
राजीव गांधी फाऊंडेशनला १५ वर्षांपूर्वी चीनकडून मिळालेल्या देणगीचा २०२० मध्ये मोदी सरकारच्या काळात चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीशी काय संबंध आहे, असा प्रश्न उपस्थित करीत चिदम्बरम् म्हणाले की, समजा फाऊंडेशनने हे पैसे चीनला परत केले, तर चीन आपली घुसखोरी मागे घेत, सीमेवरील परिस्थिती पूर्ववत होईल, याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना देऊ शकतील का?
अर्धसत्य सांगण्याच्या आपल्या सवयीतून बाहेर या, वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नका, भारताच्या हद्दीत चीनने केलेल्या घुसखोरीबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या, असे चिदम्बरम् यांनी म्हटले. राजीव गांधी फाऊंडेशनचा मुद्दा उपस्थित करीत, चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवरून देशवासीयांचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप सुर्जेवाला यांनी केला होता. दिव्यांगाचे कल्याण आणि भारत चीन संबंधावर संशोधन करण्यासाठी ही देणगी मिळाली होती, तसेच आयकर रिटर्नमध्ये त्यावेळी या देणगीचा उल्लेखही करण्यात आला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.