किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभाजपाचा कॉंगे्रसवर जोरदार हल्ला,
नवी दिल्ली, ५ डिसेंबर – केंद्रातील मोदी सरकार शेतकर्यांच्या हितात निर्णय घेत असताना, त्यांच्या मनात कॉंगे्रस पक्ष विष कालवण्याचा, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. कॉंगे्रसने देशावर ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शासन केले. या काळात तुमच्या सरकारने शेतकर्यांसाठी काय केले, अशा शब्दांत भाजपाने आज शनिवारी हल्ला चढविला.
शेतकर्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून, त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकार आवश्यक ती सर्वच पावले उचलत आहे आणि हीच बाब कॉंगे्रसची खरी डोकेदुखी ठरत आहे. समाजातील कोणत्याही घटकाचे हित या पक्षाला कधीच पाहावले नाही. समस्या कायम ठेवणे, हेच कॉंगे्रसचे आजवरचे धोरण राहिले असल्याने, मोदी सरकारचे चांगले काम हा पक्ष कसा सहन करणार. देशावर सर्वाधिक काळ सत्ता करणार्या गांधी घराण्याने कधीतरी शेतकर्यांच्या हिताचा विचार केला आहे का, आता याच पक्षाचे नेते शेतकर्यांच्या हितात असलेल्या कृषी कायद्याविरोधात लोकांना भडकवत आहे.
शेतकर्यांचे हित, हा तर फार दूरचा विषय आहे, या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या जमिनी हडपण्यावरच भर दिला आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
आज कॉंगे्रसची खरी समस्या म्हणजे, हा पक्ष व्हेंटिलेटरवर आहे आणि राहुल गांधी व इतर नेत्यांच्या बेजबाबदार बोलण्यामुळे पक्षाच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. प्रत्येक राज्यात पराभवाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.
त्यामुळे लोकांची कशी दिशाभूल करायची, यावर या पक्षाने लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
हैदराबादेतील निकाल ऐतिहासिक
हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीतील निकाल ऐतिहासिक असेच आहेत. प्रथमच तेथील नागरिकांनी भाजपाच्या विकास कामांवर विश्वास व्यक्त केला. आतापर्यंत केवळ चार जागा असलेल्या भाजपाच्या पदरात मतदारांनी भरभरून ४८ जागा टाकल्या. त्यांच्या भाजपाकडे असलेल्या अपेक्षा वाढल्या असल्याचेच यावरून दिसून येते, असे नकवी म्हणाले.